मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे क्रीडांगण, कांदिवली (पूर्व) लोखंडवाला येथील आकुर्ली व्हिलेज येथील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे उद्यान, माटुंगा येथील महेश्वरी उद्यान, परळ येथील दादासाहेब फाळके उद्यान आणि नरे पार्क मैदानाचा नूतनीकरण करत विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने २६ कोटींची निविदा मागवली आहे.

मुंबई महापालिकेचे शहर आणि उपनगरे येथे अनेक उद्याने, क्रीडांगणे, मनोरंजन मैदाने आहेत. त्यांचा ठराविक वर्षांनी दुरुस्ती, नूतनीकरण यांच्या माध्यमातून विकास करण्यात येतो. मात्र, विकास केल्यानंतर पुढील तीन ते पाच वर्षे त्याची देखभाल दुरुस्ती करणे हे संबंधित काम करणाऱ्या कंपनीची जबाबदारी असते. मात्र प्रत्यक्षात उद्यानातील पायवाटा, झोपाळे, घसरगुंडी, व्यायाम साहित्य, आदीकडे कंत्राटदाराकडून दुर्लक्ष केला जातो. परिणामी त्या विकसित मैदान आणि उद्यानांची दुरवस्था होते.

आता महापालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच पालिका प्रशासनाने, मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे क्रीडांगणाची ११ महिन्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी ४ कोटी २२ लाख रुपये खर्चात येणार आहेत. तसेच, कांदिवली (पूर्व) लोखंडवाला येथील आकुर्ली व्हिलेज येथील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे उद्यानाच्या विकासाचे आणि श्रेणीवाढ करण्याचे काम ११ महिन्यात करण्यात येणार असून त्यासाठी महापालिका १४ कोटी ७८ लाख रुपये खर्च करणार आहे. त्याचप्रमाणे, माटुंगा येथील महेश्वरी उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम आगामी ११ महिन्यात करण्यात येणार असून त्यासाठी महापालिका ३ कोटी ९९ लाख रुपये खर्च करणार आहे. तसेच, परळ येथील दादासाहेब फाळके उद्यान, नरे पार्क मैदानाची दर्जेदार कामे करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, माटुंगा परिसरातील एम. चंदगडकर वाड्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या दोन्ही कामांसाठी ३ कोटी १५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या सर्व उद्याने, क्रीडांगणे, मनोरंजन मैदाने यांच्या विकासकामांसाठी महापालिकेने तब्बल १६ कोटी १५ लाख ३८ हजार रुपयांच्या अंदाजित खर्चाकरता निविदा मागवली आहे.
Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.

अंधेरी रेल्वे स्टेशनवरील धर्मांतराचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल ; पोलीस तपासात आली भलतीच माहिती समोर

मुंबई : सोशल मीडियावर अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतर सुरु असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात