२५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळ ऑपरेशनल हे आहे विमानांचे वेळापत्रक एका क्लिकवर !

प्रतिनिधी:अखेर २५ डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमान उड्डाण घेणार आहे. पहिले विमान माहितीनुसार बंगलोर साठी उड्डाण करणार आहे. मुंबई एमएमआरडीए महानगर प्रदेशावरील अस्तित्वात असलेल्या विमानतळांचा भार कमी व्हावा म्हणून नवी मुंबईला विमानतळ बांधणे सरकारने ठरवले होते. त्यामुळे आता त्याचे काम जवळपास पूर्णत्वाला गेले असून २५ डिसेंबरपासून (नाताळच्या निमित्ताने २५ वगळता) २६ डिसेंबरपासून सुरळीत कामकाज सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात देशभरातील महत्वाची ठिकाणे या विमानतळाअंतर्गत दळणवळणासाठी जोडण्यात येतील.


अकासा एअर २५ डिसेंबर रोजी दिल्ली आणि एनएमआयए दरम्यान त्यांची पहिली उड्डाणे सुरू करेल आणि त्यानंतर पुढील काही दिवसांत गोवा, कोची आणि अहमदाबादसाठी सेवा सुरू करेल. एअरलाइनने सांगितले की ते मुंबई महानगर प्रदेशातील दुसऱ्या विमानतळावरून हळूहळू कामकाज वाढवणार आहे दरम्यान भविष्यात ३०० देशांतर्गत आणि ५० आंतरराष्ट्रीय साप्ताहिक उड्डाणे वाढवणार असे कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे. इंडिगो या विमान कंपनीने सांगितले की ते २५ डिसेंबरपासून दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, लखनौ, उत्तर गोवा (मोपा), जयपूर, नागपूर, कोचीन आणि मंगलोर यासह भारतातील १० शहरांशी विमाने कनेक्ट होतील.


प्राथमिक माहितीनुसार कुठली विमान प्रथमदर्शनी उडणार आहेत पाहूयात -


२५ तारखेला ४ विमाने उड्डाण घेणार आहेत -


Akasa Air (QP 1832)- हे विमान नवी मुंबई येथून सकाळी ८.५० वाजता निघून दिल्लीला सकाळी ११.१५ वाजेपर्यंत पोहोचेल या विमानाची साधारण किंमत प्रति माणशी १६४०५ पासून पुढे असेल


 IndiGo (6E 5263)- हे विमान दुपारी ५.४० वाजता उड्डाण घेणार आहे ते गोव्यात जाईल. ६.५५ वाजेपर्यंत विमान गोव्यात जाईल असे सांगण्यात येत आहे. प्रति माणशी किंमत १०५०० पासून सुरु होईल.


दिल्ली -


Delhi Akasa Air (QP 1832)- नवी मुंबईहून सकाळी ८.५० वाजता निघून दिल्लीला सकाळी ११.१५ वाजता पोहोचेल (२५ डिसेंबरपासून). प्रति माणशी भाडे १६४०५ पासून पुढे सुरू होईल


IndiGo (6E 5263)- नवी मुंबईहून सकाळी ९.२५ वाजता विमान दिल्लीला निघून सकाळी ११.२५ वाजता पोहोचेल (२५ डिसेंबरपासून) प्रति माणशी भाडे: १०५०० रुपयांपासून पुढे


बंगलोर -


IndiGo (6E 461)- नवी मुंबईहून रात्री ७.४५ वाजता उड्डाण इबेंगळुरूला रात्री ९.३५ वाजता पोहोचेल (२५ डिसेंबरपासून) प्रति माणशी भाडे ५३१५ रुपयांपासून पुढे


हैदराबाद


IndiGo (6E 882)- नवी मुंबईहून विमान सकाळी ८.४० वाजता उड्डाण करून हैदराबादला सकाळी ९.५४ वाजता पोहोचेल (२५ डिसेंबरपासून) प्रति माणशी भाडे ७७१७ रुपयांपासून पुढे


मंगळुरू


IndiGo(6E 865)- नवी मुंबईहून सकाळी १०.४० वाजता विमान उड्डाण घेत मंगळुरूला दुपारी १२.१ वाजता पोहोचेल (२५ डिसेंबरपासून) प्रति माणशी १३६३० रुपयांपासून पुढे


अहमदाबाद


Akasa Air (QP 1916)- नवी मुंबईहून विमान संध्याकाळी ५.४० वाजता निघून अहमदाबादला संध्याकाळी ६.५० वाजता पोहोचेल (२६ डिसेंबरपासून) प्रति माणशी भाडे ७००० रूपयांपासून पुढे


IndiGo (6E 837)- नवी मुंबईहून विमान सकाळी १०.१० वाजता निघते. अहमदाबादला सकाळी ११.१५ वाजता पोहोचते. (२५ डिसेंबरपासून). प्रति माणशी भाडे ५४८३ रुपयांपासून पुढे


जयपूर


IndiGo 6E 837 + 6E 7523)- नवी मुंबईहून विमान सकाळी १०.१० वाजता निघून जयपूरला संध्याकाळी ५.१५ वाजता पोहोचते (२५ डिसेंबरपासून). प्रति माणशी भाडे ९३६५ रुपयांपासून पुढे


लखनऊ


IndiGo (6 E830)- नवी मुंबईहून विमान संध्याकाळी ७:३० वाजता निघून लखनऊला रात्री ९:२५ वाजता पोहोचेल (२५ डिसेंबरपासून). प्रति माणशी भाडे ६०११ रुपयांपासून पुढे


जम्मू


IndiGo (6E 5263 + 6E 2293)- नवी मुंबईहून विमान सकाळी ९:२५ वाजता निघून जम्मूला संध्याकाळी ७:४० वाजता पोहोचते (२५ डिसेंबरपासून). प्रति माणशी भाडे १५५९५ रुपयांपासून पुढे


Coimbatore -


IndiGo (6E 882+ 6E 6643)- नवी मुंबईहून विमान सकाळी ८:४० वाजता निघून कोइंबतूरला ४.०५ वाजता पोहोचेल. प्रति माणशी भाडे १२४५३ रूपयांपासून पुढे


कोची


Akasa Air (QP 1915)- नवी मुंबईहून विमान दुपारी १:३० वाजता निघून कोचीला दुपारी ३:३० वाजता पोहोचेल (२६ डिसेंबरपासून). प्रति माणशी भाडे १५४०० रुपयांपासून पुढे


इंडिगो (6E 908): नवी मुंबईहून संध्याकाळी ६:२५ वाजता निघून कोचीला रात्री ८:२० वाजता पोहोचते (२५ डिसेंबरपासून). प्रति माणशी भाडे १२६२४ रुपयांपासून पुढे


नागपूर


IndiGo (6E 817)- दुपारी १:४५ वाजता निघून विमान नागपूरला दुपारी ३:२० वाजेपर्यंत पोहोचेल (२५ डिसेंबरपासून). प्रति माणशी भाडे ५३२६ रुपयांपासून पुढे


गोवा -


Indigo (6E 2054)- नवी मुंबईपासून दुपारी ४.०० वाजेपर्यंत हे विमान उड्डाण करन ५.०५ वाजेपर्यंत मोपा (गोवा) पोहोचेल. प्रति माणशी ८५३३ रूपयांपासून पुढे


Indigo (QP 1927) - नवी मुंबई विमानतळातून हे विमान संध्याकाळपर्यंत ५.४० वाजता उड्डाण (Take off) करणार असून ६.५५ वाजेपर्यंत ते विमान गोव्यात पोहोचणार


हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (NMIAL) ने विकसित केले आहे. अदानी ग्रुप आणि सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (CIDCO) यांच्या संयुक्त मालकीचे एक विशेष वेंचर होते.

Comments
Add Comment

मुंबई महापालिका निवडणूक, महायुतीचं ठरलं; भाजप १३७ आणि शिवसेना ९० जागा लढणार

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र अखेर ठरले आहे. भाजप आणि शिवसेनेत

भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने १३ जणांना चिरडले

मुंबई : भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने रात्री दहाच्या सुमारास १३ जणांना चिरडले. या अपघातात तीन महिला आणि एक

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी घेतली मतदान नियमावलीची माहिती अन् अनुभवले ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार

मुंबई महापालिका निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यात २७ उमेदवारांचा

मुंबई महापालिका निवडणूक; अर्ज विक्री साडेअकरा हजारांची, भरले गेले फक्त ४०१

शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर न झाल्याने अर्ज भरणाऱ्याचे घटले प्रमाण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईतील शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसचे अस्तित्व संपले

राखी जाधव भाजपात तर मनिषा रहाटे, पिसाळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई (विशेष प्रतिनिधी)