माजी गृहमंत्र्यांचा मुलगा भाजपच्या वाटेवर ?

नागपूर : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सलील देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. अद्याप त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. पण ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

शरद पवार आणि पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलील देशमुख यांनी राजीनामा पाठवून दिला आहे. तब्येतीचे कारण देत सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करण्यासाठी पक्षाच्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सलील देशमुख यांनी पत्रातून शरद पवार आणि पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कळवले आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन उद्या दुसऱ्या पक्षात जाणार का असा प्रश्न काही पत्रकारांनी विचारताच उद्याची परिस्थिती काय असेल ते माहिती नाही. सध्या प्रकृतीच्या कारणांनी मी राजीनामा देत आहे, असे सलील देशमुख म्हणाले.

सलील देशमुख यांनी काटोल मतदार संघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सलील देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे.
Comments
Add Comment

जामनेरच्या नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध हॅट्ट्ट्रिक

मंत्री गिरीश महाजन यांचे वर्चस्व कायम! जामनेर : जिल्ह्यात सध्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे १० नगरसेवक फुटणार ?

भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याची शक्यता पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

ताम्हिणी घाटात थार अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू

पनवेल : ताम्हिणी घाटात थार कारला भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुणे-माणगाव

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

महाआघाडीत खळबळ; भाजपकडून ‘स्वबळा’ची भूमिका ?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटावर भाजपने स्वबळावर पुढे जाण्याचे संकेत पुन्हा स्पष्ट केल्यानंतर