स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची दमदार सुरुवात

मुंबई : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया झाली. नियमानुसार अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली. या कालावधीत अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे निवडक जागांवर भाजपने बिनविरोध विजय मिळवला. या विजयांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने दमदार सुरुवात केली.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, जामनेर आणि सावदा या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा नगरसेवक पदाचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. भुसावळ येथे वार्ड क्र. ७ (अ) मधून भाजपच्या प्रीती मुकेश पाटील, जामनेरमध्ये वार्ड क्र. ११ (ब) मधून भाजपच्या उज्वला दीपक तायडे, सावदा मध्ये वार्ड क्र. ७ (अ) मधून भाजपच्या रंजना जितेंद्र भारंबे बिनविरोध विजयी झाल्या. एकाच दिवशी तीन नगरसेवकांचा बिनविरोध विजय झाला. जामनेर नगराध्यक्षपदी भाजपच्या साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली. मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी साधना महाजन सलग तिसऱ्यांदा बिनविरोध जामनेरच्या नगराध्यक्ष झाल्या आहेत. साधना महाजन यांनी जामनेरच्या नगराध्यक्षपदावर बिनविरोध विजयाची हॅटट्रिक केली.



अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे नगरसेवकपदाचे उमेदवार होते. आल्हाद कलोती यांच्या प्रभागातून रिंगणात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारासह नऊ उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली आहे. या घडामोडीनंतर आल्हाद कलोती यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व उमेदवारांनी माघार घेणे पसंत केले. हा दूरदृष्टीचा विजय आहे, असे युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे १७ उमेदवार आणि नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले. भाजपने निवडणुकीआधीच विजय मिळवला.
Comments
Add Comment

पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत

कोकणासाठी सोनेरी दिवस; महाराष्ट्र सरकार उभारणार वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग

मंत्री नितेश राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण

Game Changer Decision.... वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाला हिरवा कंदील, कोकणच्या विकासाची दारं उघडणार!'

आंबा, काजू, मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार; तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होईल – मंत्री नितेश राणे नागपूर:

Breaking News ! पालिका निवडणुकीसाठी युतीचा फॉर्म्युला ठरणार? भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज रात्री ९ वाजता महत्त्वपूर्ण बैठक

नागपूर : राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी आता लोकायुक्तांच्या चौकशीकक्षेत

महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक २०२५ विधानसभेत मंजूर नागपूर : महाराष्ट्रातील भ्रष्टाचार विरोधी यंत्रणेला

पुणे आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींना वारंवार करावी लागते 'प्रेग्नन्सी टेस्ट'; आमदारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न

नागपूर : पुणे जिल्ह्यातील आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनींना सुट्टीवरून परतल्यानंतर वारंवार