१४० कोटी भारतीयांसाठी युट्यूबची मोठी घोषणा आता व्यवसायिक शिक्षण युट्यूबवर शक्य

प्रतिनिधी: लहानांपासून थोरांपर्यंत मोठ्या प्रमाणात व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूबचा वापर होतो. टीव्हीपेक्षा अधिक वापर सध्या युट्यूबचा वापर सुरू झाला असताना एका 'ॲन्युअल युट्यूब इम्पॅक्ट समिट' या कार्यक्रमात कंपनीने डिजिटल लर्निग विषयक मोठी घोषणा व्यासपीठावर केली आहे. त्यामुळे आता विविध तंत्रज्ञान प्रणित तसेच इतर क्षेत्रातील डिजिटल लर्निग (अध्यापन) करण्यासाठी युट्यूबने नव्याने बनलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (IICT) या संस्थेशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना ॲनिमेशन असेल किंवा व्हिज्युअल इफेक्ट्स, अथवा रिअँलिटी स्टोरीटेलिंग यांचे अध्यापन करणे विद्यार्थ्यांना सहज शक्य होणार आहे. त्यामुळे आयआयसीटीचे अधिकृत युट्यूब चॅनेल उभारण्यासाठी युट्यूब विशेष सहकार्य संस्थेला करणार आहे. यासाठी दोन्ही संस्थांच्या वतीने आयटी इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करत आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरील पायाभूत सुविधेसाठीही काम केले जाणार आहे. तसेच या निमित्ताने व्यवसायिक शिक्षणाला हातभार एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लागेल. याशिवाय युट्यूब माध्यमातून आरोग्यावरील शिक्षणाला व्यवसायिक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी युट्यूब ए आय आय एम एस (AIIMS) संस्थेची हातमिळवणी करणार आहे. त्यामुळे हजारो नर्सिंग विद्यार्थ्यांना व्यवसायिक शिक्षणाची संधी यानिमित्ताने निर्माण होईल. माहितीनुसार, वाऊंड केअर, इन्फकेशन कंट्रोल याविषयक कोर्स विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील.


याशिवाय युट्यूबने एआय कन्व्हरसेशनल टूल देखील विकसित केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आपले प्रश्न विचारण्यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या आधारे ए आय टूल विकसित केले गेले आहे. गुगलप्रमाणेच आपल्या मनातील प्रश्न तुम्ही त्या एआय टूलला विचारु शकता. सध्या हे फिचर इंग्रजी भाषेत असून थोड्याच दिवसात हिंदी भाषेत देखील उपलब्ध होईल.


एका अहवालानुसार, युट्यूबकडून (YouTube) गेल्या वर्षी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) मध्ये १६००० कोटींहून अधिक योगदान दिले असून याशिवाय ९.३ लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. भारताच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून प्लॅटफॉर्मची भूमिका हे अधोरेखित होते.


YouTube इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक गुंजन सोनी म्हणाल्या आहेत की,' प्लॅटफॉर्मचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव वाढत आहे. डिजिटल कल्याणाच्या क्षेत्रात, कंपनी विश्वासार्ह आरोग्य माहिती जलद उपलब्ध करून देण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीमध्ये प्रथमोपचार शेल्फचा विस्तार करत आहे, तर तरुणांमध्ये निरोगी स्क्रीन सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी दररोज शॉर्ट व्हिडिओ स्क्रोलिंग मर्यादांसारखी वैशिष्ट्ये सादर करत आहे. सोनी यांनी पुढे सांगितले की 'भारत हा YouTube च्या जागतिक नवोन्मेष रोडमॅपमध्ये केंद्रस्थानी आहे आणि म्हणाले,'इंटरनेटचे भविष्य येथेच तयार होत आहे आणि आम्हाला त्याचा भाग असल्याचा अभिमान आहे.'


क्रिएटर फ्रंटवर, YouTube ने आपल्या YouTube क्रिएट अँपमध्ये 'एडिट विथ एआय' लाँच केले आणि समिटमध्ये बोलताना संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले आहेत की,'भारताची संस्कृती ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे आणि युट्यूबसारखे डिजिटल प्लॅटफॉर्म हे सामायिक करण्यासाठी युट्यूब देशातील सर्वात मोठे साधन आहे. जेव्हा निर्माते (Content Creator) आपल्या प्रादेशिक कला प्रदर्शित करतात अथवा स्थानिक कारागिरांचे काम अधोरेखित करतात किंवा आपल्या ऐतिहासिक स्मारकांमधून प्रेक्षकांना मार्गदर्शन करतात तेव्हा ते आपल्या वारशाचे डिजिटल राजदूत बनलेले असतात. भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी आणि जागतिक प्रेक्षकांसमोर आपली समृद्ध सांस्कृतिक कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी ही तालमेल महत्त्वाची आहे. एकत्रितपणे, आपण एक चैतन्यशील सर्जनशील अर्थव्यवस्था निर्माण करत आहोत आणि भारताचा समृद्ध वारसा जगाला प्रेरणा देत राहतो याची खात्री करत आहोत.'

Comments
Add Comment

मोठी बातमी: एमएसएमई आणि स्टार्टअप कर्ज वितरणासाठी सिडबी आणि बँक ऑफ बडोदामध्ये सामंजस्य करार

मुंबई: लघुउद्योग, एमएसएमई आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देऊन वित्तपुरवठा करून अर्थसहाय्य करणाऱ्या स्मॉल

Satbara Utara : ऐतिहासिक निर्णय! ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा; भूखंड विनाशुल्क नियमित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना थेट लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. तुकडेबंदी

Nashik Malegaon Crime News : सूडापोटी 'सैतानी कृत्य'! ३ वर्षीय चिमुरडीचं लैंगिक शोषण करून डोकं दगडाने ठेचून...गांभीर्याने तपास सुरू

मालेगाव : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील मालेगाव तालुका सध्या एका हादरवून टाकणाऱ्या आणि अमानुष घटनेने स्तब्ध झाला आहे.

Stock Market Opening Bell: 'घसरणयुक्त तेजी' शेअर बाजारात विचित्र कौल! आयटीतील जोरावर तेजी, सेन्सेक्स २९.२४ अंकाने निफ्टीत मात्र ८.०५ अंकाने घसरला

मोहित सोमण: आज सकाळी शेअर बाजारात संमिश्रित घसरणीकडे कल दिसून आला. प्री ओपनिंग सत्रात इक्विटी बेंचमार्क

Ahilyanagar News : बिबट्याच्या भीतीने शाळांच्या वेळेत तातडीने बदल! अहिल्यानगर-पुण्यातील तालुक्यांत पहिली ते चौथीसाठी वेगळी, तर माध्यमिकसाठी वेगळी वेळ जाहीर

अहिल्यानगर : अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच