मुंबई (खास प्रतिनिधी): उत्तर मुंबईमध्ये पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा गोरेगाव- मुलंड लिंक रोड विकसित करण्यात येत आहे. गोरेगाव मुलंड लिंक रोडवर अतिक्रमण मुक्त केलेल्या रस्त्यावरील भागात मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने पावसाळ्या दरम्यान आणि पावसाळ्यानंतर सुरक्षात्मक उपाय मास्टीक अस्फाल्टद्वारे सुधारणा करण्यात येत आहे.
मुंबई ( खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या वतीने तब्बल २ लाख ३२ हजार कोटींची विकास कामे हाती घेण्यात आली. ही विकास कामे पूर्ण करण्यासाठी मुदत ठेवीतील ...
पश्चिम व पूर्व उपनगरातील गोरेगाव मुलुंड लिंक रोड येथे अतिक्रमण मुक्त केलेल्या ठिकाणी शिल्लक पॅचेत्त व अतिरिक्त पट्टयांची मास्टिक अस्काल्ट वापरुन सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्यांच्या ठराविक भाग खराब झाल्याने तसेच व इतर ठिकाणी मास्टिक अस्फाल्टद्वारे सुधारणा करण्यात येत आहे. या कामांसाठी सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या करता रणुजा देव कॉर्पोरेशनची यासाठी निवड करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून बॅड पॅचेसची कामे केली जाणार आहे. ज्यामुळे अनधिकृत बांधकाम केल्यामुळे रस्त्याचा जो भाग खराब झाला आहे, त्यावर मास्टिक अस्फाल्टने बनवल्याने वाहतुकीसाठी आता या मार्गावर सुरळीत प्रवास करता येणार आहे.