Tuesday, November 18, 2025

अतिक्रमण तोडलेल्या गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांचा भाग अडथळामुक्त, या रस्त्यावरुन प्रवास करता येणार सुरळीत

अतिक्रमण तोडलेल्या गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांचा भाग अडथळामुक्त, या रस्त्यावरुन प्रवास करता येणार सुरळीत

मुंबई (खास प्रतिनिधी): उत्तर मुंबईमध्ये पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा गोरेगाव- मुलंड लिंक रोड विकसित करण्यात येत आहे. गोरेगाव मुलंड लिंक रोडवर अतिक्रमण मुक्त केलेल्या रस्त्यावरील भागात मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने पावसाळ्या दरम्यान आणि पावसाळ्यानंतर सुरक्षात्मक उपाय मास्टीक अस्फाल्टद्वारे सुधारणा करण्यात येत आहे.

पश्चिम व पूर्व उपनगरातील गोरेगाव मुलुंड लिंक रोड येथे अतिक्रमण मुक्त केलेल्या ठिकाणी शिल्लक पॅचेत्त व अतिरिक्त पट्टयांची मास्टिक अस्काल्ट वापरुन सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्यांच्या ठराविक भाग खराब झाल्याने तसेच व इतर ठिकाणी मास्टिक अस्फाल्टद्वारे सुधारणा करण्यात येत आहे. या कामांसाठी सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या करता रणुजा देव कॉर्पोरेशनची यासाठी निवड करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून बॅड पॅचेसची कामे केली जाणार आहे. ज्यामुळे अनधिकृत बांधकाम केल्यामुळे रस्त्याचा जो भाग खराब झाला आहे, त्यावर मास्टिक अस्फाल्टने बनवल्याने वाहतुकीसाठी आता या मार्गावर सुरळीत प्रवास करता येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >