महापौर भाजपचाच होईल, नरेंद्र पवार यांचे स्पष्ट विधान

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकांचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ता संघर्ष अधिक तीव्र होत आहे. भाजप आणि शिवसेनेत महापौर पदावर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरु आहे. याचदरम्यान, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी एक विधान करून शिंदे गटाला डिवचले आहे.


भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर भाजपचाच होईल,असे ठामपणे सांगितले. पवार म्हणाले, "आमचं संघटन मजबूत आहे आणि युती झाली तरीही महापौर भाजपचाच होईल. आम्ही जास्त नगरसेवक निवडून आणू आणि आमच्या संघटनेची ताकद निश्चितच महापौर पद मिळवून देईल." युतीच्या संभाव्य घटकांनी एकत्र लढल्यास महायुतीचा महापौर असणार, तर भाजप एकट्याने लढल्यासही त्यांची संघटना त्यांना विजय मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


नरेंद्र पवार यांनी भाजपमध्ये होणाऱ्या पक्ष प्रवेशांवरही भाष्य केलं. त्यानुसार, भाजपचा प्रभाव वाढत आहे कारण केंद्र आणि राज्यात सत्ताधारी पक्ष आहे. "डोंबिवलीत आमचे संघटन बळकट आहे. त्यामुळे इतर पक्षांच्या नाराज कार्यकर्त्यांना आमच्या पक्षात सामील होण्याची संधी मिळते," असे पवार म्हणाले. माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची भाजपमध्ये दाखल होण्याची प्रक्रिया चालू असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यानुसार, "शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि अन्य पक्षांचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत कारण त्यांना इतर पक्षांमध्ये आदर आणि कामाची संधी मिळत नाही."


महायुतीतील अंतर्गत पक्षांतरावर पवार यांनी सांगितले की, "आमच्या पक्षाचे नाराज कार्यकर्ते शिवसेनेत जातात, तर शिवसेनेचे कार्यकर्ते आमच्याकडे येतात. हे सर्व एकाच घरातले सदस्य आहेत. महायुतीतील दोन पक्षांतील गतीचं हे स्वरूप आहे आणि यामुळे आमची ताकद वाढली आहे." त्याचबरोबर, युती होईल न होईल, विकास निधी आणि सत्तास्थापनासाठी या दोन्ही पक्षांचे एकत्रित काम सुरू राहील, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे

पंतप्रधान मोदी १३७ व्या 'मन की बात'मधून कोणत्या विषयांवर काय बोलले ?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ३० ऑगस्ट २०२६ रोजी १३७ व्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशाला

Jaykumar Gore's Brother : भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू शिवसेनेच्या गळाला

जिल्हा परिषद निवडणुकीतील राड्याचे उट्टे काढणार?; १ सप्टेंबरला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

Tribal Students Demands : आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांकडून मान्य, मंत्री अशोक उईके यांनी दिली माहिती

शासकीय आश्रमशाळांचे 'थर्ड पार्टी ऑडिट' होणार मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक

Sharad Pawar : शरद पवारांनी बोलावलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीला रोहित पवारांची दांडी

तर्कवितर्कांना उधाण; काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चांना बळ, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून सारवासारव मुंबई