Wednesday, November 19, 2025

मोठी बातमी: एमएसएमई आणि स्टार्टअप कर्ज वितरणासाठी सिडबी आणि बँक ऑफ बडोदामध्ये सामंजस्य करार

मोठी बातमी: एमएसएमई आणि स्टार्टअप कर्ज वितरणासाठी सिडबी आणि बँक ऑफ बडोदामध्ये सामंजस्य करार

मुंबई: लघुउद्योग, एमएसएमई आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देऊन वित्तपुरवठा करून अर्थसहाय्य करणाऱ्या स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) आणि पीएसयु बँक ऑफ बडोदा (BoB) यांनी सामंजस्य कराराची घोषणा केली आहे. त्यांच्या मते, विकसित भारत २०४७ उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी व तरूणांना स्वयंरोजगार मार्गदर्शन करून अर्थ सहाय्य करण्यासाठी दोन्ही संस्था एकत्रित आल्या आहेत. देशभरातील संपूर्ण भारतातील एमएसएमई आणि स्टार्टअप इकोसिस्टीम आणखी मजबूत करण्यासाठी संयुक्तपणे कर्ज प्रवाह वाढविण्यासाठी व त्यांच्या वाढत्या भांडवलातील गरजा, तसेच खेळत्या भांडवलाची उपलब्धता (Working Capital Requirements) वाढविण्यासाठी सामंजस्य करार (Memorandum of Understanding MoU) करण्यात आला आहे. वित्तीय सेवा विभागाचे (डीएफएस ) सचिव एम. नागराजू, आयएएस यांच्या उपस्थितीत भागीदारीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

या सामंजस्य करारांतर्गत भागीदारीची प्रमुख क्षेत्रे लक्ष्य केली जाणार आहेत -

एमएसएमईसाठी संयुक्त वित्तपुरवठा: सिडबीच्या एमएसएमई फोकस आणि बँक ऑफ बडोदाच्या विस्तृत शाखा नेटवर्कच्या एकत्रित ताकदींद्वारे क्रेडिट वितरण समर्थन या अर्थसहाय्याला मिळणार आहे.

वर्किंग कॅपिटल सक्षमीकरण: (सिडबी- मंजूर) कर्जदारांसाठी बीओबीच्या वर्किंग कॅपिटल प्लॅटफॉर्मचे ऑपरेशनलायझेशन करारा अंतर्गत होणार आहे. त्यामुळे खेळत्या भांडवलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

स्टार्टअप वित्तपुरवठा: स्टार्टअप्ससाठी पद्धतशीर पद्धतीने अर्थसहाय्य केले जाईल. माहितीनुसार, एसआयडीबीचा व्हेंचर डेट प्रोग्राम आणि बँक ऑफ बडोदाच्या स्टार्टअप बँकिंग सोल्यूशन्स, ज्यामध्ये वित्तीय उत्पादने, सल्लागार आणि कस्टमाइज्ड ऑफरिंगचा समावेश या इकोसिस्टीममध्ये असणार आहे.

निर्यात प्रोत्साहन: बँक ऑफ बडोदाच्या जागतिक नेटवर्कचा लाभ घेण्यासाठी एमएसएमई आणि चांगले प्रदर्शन करत असलेल्या स्टार्टअप्सना सक्षम करणे निर्यात संबंधित बँकिंग प्रोत्साहन मिळणार आहे. बाजारपेठात कसा प्रवेश मिळावा आणि निर्यात कशी वाढवावी यासाठी आंतरराष्ट्रीय बँकिंग सोल्यूशन्स उद्योजकांना प्रदान करण्यात येईल.

क्लस्टर आणि इनोव्हेशन सपोर्ट: देशभरातील एमएसएमई क्लस्टर्स, इनक्यूबेटर, एक्सीलरेटर आणि स्टार्टअप इकोसिस्टमसाठी हा संयुक्त कार्यक्रम असेल.

याविषयी आपली प्रतिक्रिया देताना डीएफएसचे सचिव एम. नागराजू, आयएएस, मुख्य भाषण देताना म्हणाले आहेत की,'ही भागीदारी एमएसएमई आणि स्टार्टअप्ससाठी एक मजबूत क्रेडिट इकोसिस्टम तयार करण्यासाठी समर्पित एमएसएमई विकास संस्था आणि एका मोठ्या व्यावसायिक बँकेची ताकद एकत्र आणते. बँक ऑफ बडोदाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पोहोचासह सिडबीच्या नावीन्यपूर्ण वित्तपुरवठा मॉडेल्सचे संयोजन करून, हा सामंजस्य करार पारंपारिक आणि नवीन युगातील उद्योगांना वेळेवर कार्यरत भांडवल मिळविण्यास, ऑपरेशन्स स्केल करण्यास आणि जागतिक मूल्य साखळींमध्ये (Global Supply Chain) एकत्रित होण्यास मदत करेल.'

डीएफएसचे संयुक्त सचिव मनोज अय्यप्पन म्हणाले आहेत की,'एसआयडीबी-बँक ऑफ बडोदा भागीदारी भारताच्या एमएसएमई आणि स्टार्टअप इकोसिस्टमला बळकट करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. एसआयडीबीची विकासात्मक कौशल्ये आणि बँक ऑफ बडोदाची मजबूत राष्ट्रीय आणि जागतिक उपस्थिती एकत्र करून, हे सहकार्य वेळेवर आणि परवडणाऱ्या कर्जाची उपलब्धता लक्षणीयरीत्या वाढवेल.'

एसआयडीबीचे सीएमडी मनोज मित्तल म्हणाले, '३५ वर्षांपासून, सिडबीने प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आणि डिजिटल हस्तक्षेपांद्वारे एमएसएमई आणि स्टार्टअप वित्तपुरवठा लँडस्केपला आकार दिला आहे. या सामंजस्य करारामुळे एमएसएमई तसेच उच्च-क्षमतेच्या स्टार्टअप्सना व्हेंचर डेट, डिजिटल क्रेडिट आणि समन्वित खेळत्या भांडवल उपायांद्वारे संयुक्तपणे पाठिंबा देण्याची आमची क्षमता वाढली आहे. भारताच्या एंटरप्राईज वाढीला गती देण्यासाठी आम्ही ही एक संधी म्हणून पाहतो.'

बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक ललित त्यागी म्हणाले आहेत की,'बँक ऑफ बडोदा एमएसएमई आणि उदयोन्मुख स्टार्टअप इकोसिस्टमला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे. या भागीदारीद्वारे आम्ही संयुक्त वित्तपुरवठा मजबूत करू, डिजिटल क्रेडिट सक्षमीकरण वाढवू आणि स्टार्टअप्ससाठी विशेष बँकिंग उपायांचा विस्तार करू. आमची जागतिक उपस्थिती एमएसएमई आणि स्टार्टअप्सना निर्यात संधींचा फायदा घेण्यास मदत करेल'.

कार्यक्रमादरम्यान डीएफएसचे सचिव यांनी एसआयडीबीआय-बीओबी सामंजस्य करारांतर्गत मंजुरी पत्रे एमएसएमई ग्राहकांना सुपूर्द केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >