वांद्रे आणि खार पश्चिम भागात रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्‍या जल अभियंता विभागामार्फत वांद्रे पश्चिम येथील पाली हिल जलाशयाच्‍या इनलेटवरील व्‍हॉल्‍व्‍ह दुरूस्‍तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. शनिवारी २२ नोव्‍हेंबर २०२५ रोजी मध्‍यरात्री १ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत हे दुरूस्‍ती कामकाज अपेक्षित असून दुरूस्‍ती पूर्ण झाल्‍यानंतर पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. मात्र, या दुरुस्तीमुळे ‘एच पश्चिम’ विभागातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्‍यामुळे नागरिकांनी पाण्‍याचा पुरेसा साठा करावा व काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.


एच पश्चिम’ अर्थात वांद्रे आणि खार पश्चिम विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून - गाळून प्यावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


या भागात होणार कमी दाबाने पाणीपुरवठा


खार दांडपाडा, गजधरबंध झोपडट्टीचा काही भाग, खार पश्चिमेचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी ६.३० ते ८.३० वा.) (वेळेत बदल नाही) (कमी दाबाने पाणीपुरवठा)


कांतवाडी परिसराचा काही भाग, पालीनाका, पाली गावठाण, शेरली, राजन व माला गावाचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वा.) (वेळेत बदल नाही) (तुलनेने कमी दाबाने पाणीपुरवठा)


खारदांडा काेळीवाडा, दांडपाडा, च्युइम गावठाण, गजदरबंध झोपडट्टीचा काही भाग, खार पश्चिमेचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सायंकाळी ५.३० ते रात्री १०.०० वा.) (विस्तारित तास) (कमी दाबाने पाणीपुरवठा)


हनुमान नगर, लक्ष्मी नगर, युनियन उद्यान मार्ग क्रमांक १ ते ४, पालीहिल आणि च्युइम गावाचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० वा.) (वेळेत बदल नाही) (कमी दाबाने पाणीपुरवठा).


‘एच पश्चिम’ विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून - गाळून प्‍यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री