मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत वांद्रे पश्चिम येथील पाली हिल जलाशयाच्या इनलेटवरील व्हॉल्व्ह दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. शनिवारी २२ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत हे दुरूस्ती कामकाज अपेक्षित असून दुरूस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. मात्र, या दुरुस्तीमुळे ‘एच पश्चिम’ विभागातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा व काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
एच पश्चिम’ अर्थात वांद्रे आणि खार पश्चिम विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून - गाळून प्यावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
या भागात होणार कमी दाबाने पाणीपुरवठा
खार दांडपाडा, गजधरबंध झोपडट्टीचा काही भाग, खार पश्चिमेचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी ६.३० ते ८.३० वा.) (वेळेत बदल नाही) (कमी दाबाने पाणीपुरवठा)
कांतवाडी परिसराचा काही भाग, पालीनाका, पाली गावठाण, शेरली, राजन व माला गावाचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वा.) (वेळेत बदल नाही) (तुलनेने कमी दाबाने पाणीपुरवठा)
खारदांडा काेळीवाडा, दांडपाडा, च्युइम गावठाण, गजदरबंध झोपडट्टीचा काही भाग, खार पश्चिमेचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सायंकाळी ५.३० ते रात्री १०.०० वा.) (विस्तारित तास) (कमी दाबाने पाणीपुरवठा)
हनुमान नगर, लक्ष्मी नगर, युनियन उद्यान मार्ग क्रमांक १ ते ४, पालीहिल आणि च्युइम गावाचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० वा.) (वेळेत बदल नाही) (कमी दाबाने पाणीपुरवठा).
‘एच पश्चिम’ विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून - गाळून प्यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.






