मोहित सोमण: सुदीप फार्मा लिमिटेड कंपनीने आपली प्राईज बँड (Price Band) आज जाहीर केला आहे. ५६३ ते ५९३ रूपये प्रति शेअर हा निश्चित करण्यात आला असून १ रूपयांच्या दर्शनी मूल्य (Face Value) नुसार हा विकला जाईल. ८९५ कोटींचा हा आयपीओ २१ ते २५ नोव्हेंबर कालावधीत गुंतवणूकीसाठी उपलब्ध होणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) २६ नोव्हेंबरला होणार असून २८ नोव्हेंबरला शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. किरकोळ अथवा रिटेल गुंतवणूकदारांना किमान १४७२५ रूपये (२५ शेअर) गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली असून ICICI Securities लिमिटेड कंपनी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहे. तर MUFG Intime India Private Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. एकूण १५०९२७५० शेअर (८९५ कोटी मूल्यांकन) बाजारात कंपनीतर्फे उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यापैकी १६०२०२४ शेअर (९५ कोटी मूल्यांकन) बाजारात फ्रेश इशू असून उर्वरित ८०० कोटी मूल्यांकन असलेले १३४९०७२६ शेअर ऑफर फॉर सेल (OFS) साठी उपलब्ध असणार आहेत. बीएसई व एनएसईवर शेअर सूचीबद्ध होणार आहे.
पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) ५०% वाटा, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५% वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १५% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. सुजित भयानी, अवनी भयानी, शनिल भयानी, सुजित भयानी हिंदू अनडिवायडेड फॅमिली, रिवा रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड, भयानी फॅमिली ट्रस्ट हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.
आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर १०% वाढ झाली असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) इयर ऑन इयर बेसिसवर ४% वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला तिमाही बेसिसवर (QoQ) मार्च तिमाहीतील ५११.३३ कोटींच्या तुलनेत जून तिमाहीत कंपनीला १३०.०८ कोटीचे उत्पन्न मिळाल्याने कंपनीच्या उत्पन्नात मोठी घसरण झाली आहे. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात जून तिमाहीतील १३८.६९ कोटींच्या तुलनेत जून तिमाहीत ३१.२७ कोटी घसरण झाली आहे. ईबीटा (EBITDA) मध्येही जून तिमाहीतील १९९.२८ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ४८.५७ कोटींवर घसरण झाली आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ६६९७.७५ कोटी रूपये आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी भांडवली खर्चासाठी (Capital Expenditure), व दैनंदिन कामकाजासाठी (General Corporate Purposes) करण्यात येणार आहे. माहितीनुसार, या नवीन इश्यूमधून मिळणारे ७५.८ कोटी रुपयांचे उत्पन्न गुजरातमधील नंदेसरी फॅसिलिटी १ येथे असलेल्या तिच्या उत्पादन लाइनसाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी व यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी भांडवली खर्चासाठी असेल असे कंपनीने आपल्या डीएचआरपीत (Draft Red Herring Prospectus DHRP) मध्ये म्हटले होते. कंपनी औषधनिर्माण, अन्न आणि पोषण उद्योगांसाठी एक्सिपियंट्स आणि विशेष घटकांची तंत्रज्ञान प्रणित उत्पादक आहे आणि जागतिक आरोग्यसेवा परिसंस्थेत (Ecosystem) योगदान देण्यासाठी कार्य करत आहे. कंपनी ऑपरेशन्समध्ये नावीन्य आणण्याच्या प्रयत्नात एन्कॅप्सुलेशन, स्प्रे ड्रायिंग, ग्रॅन्युलेशन, ट्रायच्युरेशन, लिपोसोमल तयारी आणि ब्लेंडिंग यासारख्या प्रक्रियांसाठी तिच्या अंतर्गत विकसित तंत्रज्ञानाचा वापर करते.
माहितीनुसार, कंपनीने युनायटेड स्टेट्स, दक्षिण अमेरिका, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका आणि आशिया-पॅसिफिक सारख्या प्रमुख प्रदेशांसह १०० हून अधिक देशांमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपले अस्तित्व प्रस्थापित केले आहे. ३० जून २०२५ पर्यंत ७२२४६ मेट्रिक टन वार्षिक उपलब्ध उत्पादन क्षमता असलेली ही कंपनी उत्पादन क्षमतेच्या बाबतीत शिशु पोषण, क्लिनिकल पोषण आणि अन्न आणि पेय क्षेत्रांसाठी अन्न-दर्जाच्या लोह फॉस्फेटच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे (स्रोत: एफ अँड एस अहवाल). त्याच तारखेपर्यंत तिच्या एका उत्पादन सुविधेला खनिज-आधारित घटकांच्या निर्मितीसाठी युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अँडमिनिस्ट्रेशन (यूएसएफडीए) ने मान्यता दिली आहे.
कंपनीने ११०० हून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे आणि फायझर इंक, इंटास फार्मास्युटिकल्स लिमिटेड, मॅनकाईंड फार्मा लिमिटेड, मर्क ग्रुप, अलेम्बिक फार्मास्युटिकल लिमिटेड, अरबिंदो फार्मा लिमिटेड, कॅडिला फार्मास्युटिकल लिमिटेड, आयएमसीडी एशिया लिमिटेड मायक्रो लॅब्स लिमिटेड आणि डॅनोन एसए यासारख्या प्रमुख ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध निर्माण केले आहेत असे कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले होते.