मुंबई : डोंबिवलीतील राजकीय घडामोडींमध्ये मोठा बदल झाला आहे. माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल म्हात्रे, माजी नगरसेवक महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे आणि कल्याण-दोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
या वेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षात नवीन नेत्यांचे स्वागत केले. समारंभात कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, भाजप डोंबिवली पश्चिम मंडलाचे माजी अध्यक्ष समीर चिटणीस, माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक राहूल दामले, मंदार हळबे, जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
रविंद्र चव्हाण म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे आणि संजय विचारे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या भागातील सर्व कार्यकर्त्यांनी दीर्घकाळ एकत्र काम केले आहे आणि मविआ सरकारच्या काळात त्यांना अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. आता विकासाच्या दृष्टीने काम करणे हा उद्देश आहे.”
अनमोल म्हात्रेसोबत भाजपात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अश्विनी म्हात्रे, शिवसेनेचे युवा विभाग प्रमुख गजानन जोशी, विभाग अध्यक्ष ओमकार सुर्वे, माधुरी साळुंके, सुषमा सावंत, अलका कोलते, सविताताई शेलार, लक्ष्मीताई रानभरे आणि श्रद्धा माने यांचा समावेश आहे.
महेश पाटील आणि डॉ. सुनीता पाटील यांच्यासोबत भाजपात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अण्णा राणे, संजय विचारे, शाखा प्रमुख सरिता शर्मा, विभाग प्रमुख संगीता अंबरे, उपविभाग प्रमुख आरती चव्हाण, अलका कुळे, छाया कांबळे, उपविभाग प्रमुख ऋषिकेश देशमुख, विभाग प्रमुख दीपक पारेख, शाखा प्रमुख वसंत सुखदरे, सुनील पाटील आणि संदीप तेमुरे यांचा समावेश आहे.
या पक्षप्रवेशामुळे डोंबिवली आणि कल्याण परिसरातील भाजपाची ताकद वाढेल, अशी अपेक्षा आहे.