सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे
साहित्य :
डिंक (गोंद) - अर्धा कप , खारीक पावडर - अर्धा कप, बदाम - पाव कप, काजू - पाव कप, अक्रोड - पाव कप, भोपळ्याच्या बिया - २ टेबलस्पून, तीळ (पांढरे) - २ टेबलस्पून. खोबऱ्याचा किस - २ टेबलस्पून, वेलची पावडर - अर्धा टीस्पून, साजूक तूप - ३-४ टेबलस्पून यात कोणतीही साखर किंवा गूळ नाही. गोडी पूर्णपणे खारीक (ड्राय डेट पावडर) मधून येते.
कृती :
डिंक भाजून घ्या. कढईत १ टीस्पून तूप गरम करा. डिंक घालून तो फुलून पॉपकॉर्नसारखा फुगेपर्यंत भाजा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर पूड करा.बदाम, काजू, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, तीळ, खोबरे कमी आचेवर वेगवेगळे भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये खूप बारीक न करता हलका जाडसर क्रश करा. सर्व साहित्य एकत्र करा. एका मोठ्या भांड्यात डिंक पावडर, खारीक पावडर, ड्रायफ्रूट क्रश, वेलची पावडर एकत्र मिसळा. कढईत साजूक तूप कोमट गरम करून थोडं-थोडं मिश्रणात घालून लाडू वळा. लाडू व्यवस्थित चिकटण्यासाठी साधारण ३-४ टेबलस्पून तूप पुरसे. लाडू १०-१५ मिनिटं ठेवले की घट्ट होतात आणि छान स्वाद येतो.
टिप्स (खास!)
खारीक पावडर गोडी देणारी असल्याने साखर + गूळ लागणार नाही.
मुलांसाठी ड्रायफ्रूट्स थोडे बारीक वाटून वापरा.
जास्त प्रोटीन हवं असल्यास २ टेबलस्पून भुईमूग पावडर किंवा प्रोटीन पावडर मिसळू शकता.