महायुतीत कुरबुरी ? एकनाथ शिंदेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबई : राज्यात महायुतीत मिठाचा खडा पडतो की, काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीवर शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी बहिष्कार टाकला आणि अनुपस्थित राहिले. महत्वाची बाब ही आहे की, या नाराजी नाट्यादरम्यान शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे मात्र या बैठकीस उपस्थित होते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.


फोडाफोडीचे राजकारण हे या नाराजी मुख्य कारण होते. शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महायुतीमधील फोडाफोडीच्या राजकारणावर मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. महायुतीमधील घटकपक्ष एकमेकांचे आमदार, माजी आमदार, नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी फोडणार नाही, असा निर्णय फडणवीस आणि शिंदे उपस्थित असलेल्या बैठकीत झाला.


एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया


महायुतीतल्या कुरबुरींचे वृत्त मीडियाने देण्यास सुरुवात केली. ही बातमी येऊ लागताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मीडिया प्रतिनिधींनी 'ऑफ द रेकॉर्ड' प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेुळे महायुतीमधील नाराजी नाट्यावर पडदा पडला आहे. महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली आहे. खाली काही असले तर सर्वात जास्त जागांवर युती करायची आहे. आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून एकत्र राहायचे आहे. युतीधर्म पाळण्यासाठी आम्ही बिहारपर्यंत जातो. भाजपच्या नेत्यांना या बाबतीत समज देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. शिवसेनेच्या नेत्यांना या बाबतीत समज देण्याची जबाबदारी माझी", असं थोडक्या पण स्पष्ट शब्दात एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे