राज्यात अनेक जिल्ह्यांना आज थंडीचा इशारा

मुंबई : राज्यात सर्वदूर तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. गेले अनेक दिवस थंडीचा कडाका कायम असून मंगळवारी (दि. १८ नोव्हेंबर) राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. धुळे येथे ६.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद मंगळवारी झाली. सांताक्रूझ कोकणातील अलिबाग, रत्नागिरी, डहाणू भागातही थंडी वाढली आहे.


राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढले आहेत. त्यामुळे कोरड्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होताना दिसून येत आहे. परिणामी राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. विशेषत° मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमानात घसरण होणार असून थंडी वाढणार आहे. राज्यातील जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड , हिंगोली या जिल्ह्यात मंगळवारी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.


अनेक जिल्ह्यांमधील कमाल आणि किमान तापामानात वेगाने घट होत आहे. उन्हाळ्यात प्रचंड तापणाऱ्या विदर्भात देखील किमान तापमान यवतमाळ येथे ९.६ अंश सेल्सिअस तर, गोंदिया येथे १० अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. गेल्या दोन दिवसांत राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद धुळे तसेच जेऊर येथे ८ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे.


नोव्हेंबरचा दुसरा आणि तिसरा आठवडा चांगलाच गारठवणारा ठरला. त्यामुळे ग्रामीण भागातच नाही तर शहरातही रात्रीच्या वेळी रस्त्यांवर ठिकठिकाणी मजूर, कष्टकरी थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत. आतापर्यंत रात्री ते पहाटेपर्यंत जाणवणारी थंडी आता दिवसाही जाणवत आहे.


राज्यात पुढील दोन दिवस थंडीची तीव्रता अधिक जाणवणार आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्यांनी थंडीपासून वाचण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. राज्यात नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपल्यानंतर अचानक थंडीत वाढ झाली. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर वाढला असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

Comments
Add Comment

BMC : मानखुर्द आणि गोवंडी परिसरातील स्वच्छतेविषयक कामांची आयुक्तांनी केली पाहणी, असे दिले निर्देश..

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी पूर्व उपनगरातील मानखुर्द आणि गोवंडी परिसरातील

Redevelopment of Pagdi Buildings : मुंबईतील पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न; जुने भाडेकरुन आजही आपल्या हक्काच्या घरापासून वंचित

- सुधार समितीत सदस्यांनी व्यक्त केली चिंता मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पागडी तत्वावरील अर्थात ना उपकर

Mulund Dumping Ground : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची जागा धारावी विकास प्रकल्पाला देण्याचा प्रस्ताव लांबणीवर

भाडेपट्ट्यांवर देण्याचा प्रस्ताव सुधार समितीने ठेवला राखून पुढील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता मुंबई

BMC News : सेव्हन हिल्स रुग्णालयाचा तिढा सुटला, सुधार समितीने दिली मंजुरी

आता ७६ खाटा आणि नंतर मिळणार ३०० खाटा महापालिकेला सेव्हन हिल्स हेल्थकेअरसोबत कॅप्री ग्लोबलसोबत करार करण्यास

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे

Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य