Monday, November 17, 2025

मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ‘सीएनजी’ संकट!

मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ‘सीएनजी’ संकट!

रिक्षा-टॅक्सींच्या लांबच लांब रांगा

मुंबई : मुंबई आणि ठाण्यात अचानक सीएनजीचा पुरवठा विस्कळीत झाल्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक सीएनजी पंपांवर पुरवठा थांबला. ज्यामुळे चालकांची गैरसोय झाली. खराब झालेल्या पाइपलाइनमुळे वडाळा इथल्या एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) इथे बराच काळ गॅस पुरवठा विस्कळीत झाला. मुंबईतील बसेस, ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी ही अनेक सार्वजनिक वाहने एमजीएलद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सीएनजीवर अवलंबून असतात. त्यामुळे सीएनजीचा पुरवठ्यातील खंडामुळे या वाहनांच्या सेवांवर गंभीर परिणाम झाला. प्रवाशांसोबतच वाहनचालकांचीही प्रचंड गैरसोय झाली.

मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबईतील अनेक पंप, विशेषत: सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांना इंधन पुरवठा करणारे पंपदेखील बंद पडले. सीएनजी पेट्रोलपंप परिसरातील रस्त्यावर सीएनजी रिक्षांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. गॅसच नसल्याने अनेक रिक्षाचालकांना सोमवारी आपल्या व्यवसायावर पाणी सोडावे लागले असून रिक्षा घेऊन रस्त्यावर उभे राहण्याची वेळ आली.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांनो आजही सीनजीसाठी पंपावर जाऊ नका

हे संकट मंगळवारपर्यंत कायम राहणार आहे. १८ नोव्हेंबर दुपारी २ वाजेपर्यंत काम सुरू राहणार आहे. सध्या महानगर लिमिटेडच्या एकूण ३८९ सीएनजी स्टेशन्सपैकी २२५ स्टेशन्स चालू आहेत. मंगळवारी दुपारनंतर पुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

अन्यथा स्कूल बस रस्त्यावर उतरणार नाहीत गेल इंडियाच्या मुख्य गॅस पाइपलाइनला वडाळा परिसरातील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स कंपाऊंडमध्ये नुकसान झाल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे महानगर गॅस लिमिटेडच्या सिटी गेट स्टेशनला होणारा गॅस पुरवठा खंडित झाला आहे, ज्याचा परिणाम मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी स्टेशनवर झाला आहे. सीएनजी टंचाईमुळे प्रवाशांना, विशेषतः विमानतळावर जाणाऱ्या लोकांना, गोंधळाचा सामना करावा लागला आहे आणि यामुळे वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील बस, रिक्षा, टॅक्सी, ओला-उबरवरही त्याचा परिणाम झाला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत ही सेवा पूर्ववत होऊ शकली नाही, तर स्कूल बस रस्त्यावर उतरवणे कठीण होईल. मुंबईकरांच्या दैनंदिन व्यवहारावर ह्या सीएनजी तुटवड्यामुळे मोठा फटका बसला आहे.

Comments
Add Comment