विक्रोळीच्या बुद्ध विहारातून भगवान गौतमांची चोरीला गेलेली मूर्ती मिळाली, सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी केला चोराचा पर्दाफाश

मुंबई: विक्रोळी येथील बुध्द विहारातून भगवान गौतम बुध्दांची पुरातन मूर्ती चोरणाऱ्यांना विक्रोळी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या सहाय्याने अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला शोधून काढत वांद्रे परिसरातून अटक केली. विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील बुध्दविहारात सुमारे १३ किलो वजनाची जपानी बनावटीची पंचधातूची पुरातन बुध्द मूर्ती आहे. ही मुर्ती १३ नोव्हेंबर रोजी चोरी झाल्याने विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होती.


चोरीच्या तपासासाठी विक्रोळी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करत घटनास्थळ आणि परिसराचे सीसीटीव्ही तपासले. यावेळी एक संशयित इसम पाठीवर पांढऱ्या रंगाची जड पिशवी घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे चोराचा मागोवा घेतला.




चोराने चोरी केल्यानंतर विक्रोळी स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाकडे जाणारी लोकल पकडली. यामुळे पोलिसांनी विक्रोळी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानच्या सर्व स्थानकांवरील सीसीटीव्ही तपासले. तपासणी दरम्यान संशयित चोर दादरला उतरून पश्चिम रेल्वेकडे जाताना दिसला. त्यामुळे पोलिसांनी परत पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवरील सीसीटीव्ही तपासले. यावेळी चोर माहिमला उतरल्याचे समोर आले.


यानंतर पोलिसांनी माहिम परिसरातील सीसीटीव्ही तपासले. दरम्यान संशयित चोर एका भंगारच्या दुकानात मूर्ती घेऊन जात असल्याचे दिसले. यावेळी पोलिसांनी पुढील तपास करत संशयित आरोपी जितेंद्र बिनकर (४६) आणि त्याचा साथीदार मार्टीन कन्नन (४६) या दोघांना सापळा रचून अटक केली. तसेच भगवान गौतम बुध्दांची मूर्ती ताब्यात घेण्यात आली आहे. ही कारवाई विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत नाईकवाडी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदेश मोरे, पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक पंकज पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश चिंचळे आदींच्या पथकाने केली.

Comments
Add Comment

Corporate Action Today: आज 'या' कंपन्यांच्या लाभांशासाठी एक्स डेट व या 'या कंपन्यांसाठी राईट इश्यूसाठी अंतिम मुदत जाणून घ्या १० शेअर्सची लिस्ट

मोहित सोमण: काही कंपन्यानी लाभांश देण्यासाठी आपली एक्स डेट संचालक मंडळाच्या बैठकीनंतर घोषित केली होती. एक्सचेंज

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

माकडांची मस्ती बेतली तरुणीच्या जीवावर; राजगडावर घडली भयंकर घटना

पुणे : राजगड किल्ला सर करण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तरुणीच्या डोक्यात दगड पडल्याने तरुणी जखमी झाली आहे.

विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक; मंगल नांगरे पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री

बॉलीवूडचे खलनायक प्रेम चोप्रांची तब्येत स्थिर, लीलावती रुग्णालयातून दिला डिस्चार्ज

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रा यांची तब्येत बरी नव्हती. वयानुसार

मुलांच्या तिकीट बुकिंगच्या नियमात बदल ५-१२ वर्षे वयादरम्यान तिकिटाचे धोरण ठरणार

मुंबई : भारतीय रेल्वेच्या २०२५ च्या बाल तिकीट धोरणानुसार ५ वर्षांखालील मुले स्वतंत्र बर्थ किंवा सीट न घेता