२५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून इंडिगो आणि अकासा विमानसेवा सुरू

मुंबई : २५ डिसेंबर रोजी नवी मुंबईच्या विमान तळावरून प्रत्यक्षात पहिले व्यवसायिक विमान उड्डाण घेणार आहे. शिवाय प्रत्यक्ष उड्डाणासाठी तिकीट नोंदणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. ही बाब विमान प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे. इंडिगोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणांसाठी सविस्तर योजना जाहीर केली आहे. २५ डिसेंबरपासून, इंडिगो नवी मुंबई विमानतळावरून देशभरातील १० शहरांमध्ये उड्डाणे चालवेल. यामध्ये दिल्ली, बंगळूरु, हैदराबाद, अहमदाबाद, लखनऊ, उत्तर गोवा (मोपा), जयपूर, नागपूर, कोची आणि मंगलोर यांचा समावेश आहे. एअरलाइन हळूहळू इतर शहरांमध्ये उड्डाणे वाढवण्याची योजना
आखत आहे.


एअर इंडियाने नवी मुंबईवरून चालणाऱ्या उड्डाणांसाठी आधीच सविस्तर योजना जाहीर केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, एअर इंडिया २० डेली फ्लाइट्स (४० एटीएम) चालवत आहे. अकासा एअरची चार शहरांसाठी थेट फ्लाइट्स: अकासा एअर २५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून थेट चार भारतीय शहरांना जोडेल. एअरलाइन पहिल्या दिवशी दिल्ली आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान पहिली फ्लाइट चालवेल. नवी मुंबईहून गोवा, कोची आणि अहमदाबादलाही फ्लाइट्स चालवल्या जातील. बुकिंग आधीच सुरू झाले आहे.

Comments
Add Comment

सतत स्क्रीनचा वापर करून डोळे थकले असतील तर न चुकता खा हे आठ पदार्थ, चष्म्याचा नंबरही होईल आपोआप कमी

मुंबई : बदललेल्या जीवनशैलीत लॅपटॉप, मोबाईल यांसारख्या स्क्रीनसमोर तासन्‌तास काम करणे महत्वाचे झाले आहे. याचा

बाणेरमधील आरोपीला दिल्लीतून पाच महिन्यांनंतर अटक

पुणे : बाणेर भागात रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यू प्रकरणी एकाला दिल्लीतून अटक

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर

मच्छिमारांसाठी पॅकेजची मागणी

श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग