प्रतिनिधी:डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना आणखी एक धमकी दिली आहे. रशियन कंपन्यांशी व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या व कडक 'सॅंक्शन ' (Sanction) साठी सामोरे जावे लागणार आहे. वर्ल्ड काँग्रेसकडून दबाव टाकला जात असताना,' हो माझ्या कानावर आले आहे. रिपब्लिकन हा प्रस्ताव विधीमंडळात आणत आहेत. रशियाशी जो कोणी व्यवसाय (Business) करेल त्यावर हे कडक निर्बंध घातले जातील. यात इराणचाही समावेश होऊ शकतो मी त्यासाठी प्रस्ताव पाठवला होता.' असे उत्तर पत्रकारांना दिले आहेत.
यापूर्वी ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदी करत असल्याने जगभरातील सर्वाधिक ५०% कर भातावर लावला होता. अद्याप यावर दोन्ही देशांकडून बोलणी सुरु आहे अद्याप तोडगा निघालेला नाही. मात्र ट्रम्प यांनी या वृत्तावर दुजोरा दिला आहे. दरम्यान रिपब्लिकन पक्षातले सिनेटर लिंडसे गग्रॅहम यांनी थेट रशियाकडून दुय्यम खरेदी करण्यासह रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातदारांवर ५००% कर लावण्याचा कर लावावा असे विधायक विधीमंडळात मांडले आहे.
'अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या टीमने रशिया आणि युक्रेनमधील रक्तपात संपवण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन राबवत एक शक्तिशाली पाऊल उचलले आहे. तथापि, या युद्धाचा अंत करण्यासाठी अंतिम हातोडा म्हणजे चीन,भारत आणि ब्राझील सारख्या देशांविरुद्ध शुल्क लादणे,जे स्वस्त रशियन तेल आणि वायू खरेदी करून पुतिनच्या युद्धयंत्रणेला पाठिंबा देतात' असे ग्राहम आणि ब्लूमेंथल यांनी जुलैमध्ये संयुक्त निवेदनात म्हटले होते.
दरम्यान तीन आठवड्यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्पष्टपणे युएसला इशारा देत ' आम्ही युएस व परकीय शक्तींच्या दबावाखाली येणार नाही. आमच्या अर्थव्यवस्थेलाही कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही ' असे म्हटले होते.