उबाठा युवा सेनेतील ३०० कार्यकर्ते शिंदे गटात

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना दिसत आहेत. काही पक्षातील लोक राजीनामे देऊन दुसऱ्या पक्षाची साथ धरताना दिसत आहेत. नुकताच बीड जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे ताजे असतानाच जळगाव जिल्ह्यातही राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.


ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा अत्यंत मोठा धक्काच ठाकरे गटाला म्हणावा लागेल. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटातील युवा सेनेतील महानगर प्रमुख यश इंद्रराज सपकाळे व गजू कोळी यांच्यासह ३०० कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून हा अत्यंत मोठा धक्का ठाकरे गटाला आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, मंत्री गुलाबराव पाटील व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे महानगराध्यक्ष संतोष पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले. आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गटांच्या संघटनेला या प्रवेशाने बळकटी मिळाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.


आगामी काळात पक्षाचे संघटन अधिकाधिक मजबूत करू असे आश्वासन यावेळी नवनियुक्त शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे. यामुळेच आगामी काळातील निवडणुकांमध्ये शिंदे गटाची ताकद जळगाव जिल्ह्यांत बघायला मिळेल. आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्याची सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न केली जात आहेत. राज्यात महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये असणार की नाही? हे स्पष्ट झाले नाहीये.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; कोणत्या शहरांमध्ये गारठा वाढणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज!

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात थंडीचा जोर वाढत असल्याचे हवामान विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अनेक

विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक; मंगल नांगरे पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री

मुलांच्या तिकीट बुकिंगच्या नियमात बदल ५-१२ वर्षे वयादरम्यान तिकिटाचे धोरण ठरणार

मुंबई : भारतीय रेल्वेच्या २०२५ च्या बाल तिकीट धोरणानुसार ५ वर्षांखालील मुले स्वतंत्र बर्थ किंवा सीट न घेता

ला निनाच्या प्रभावामुळे यंदा मुंबईकर गारठणार

मुंबई : नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.

एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पुलाचे काम सुरू

मुंबई : १२५ वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पुलाच्या दोन्ही

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च