इन्स्टाग्राम स्टारचा घोटाळा; ईडीची धाड सांगून तरुणीला ९२ लाखांचा गंडा

ठाणे (डोंबिवली) : सोशल मीडियावर हिरोसारखा लूक, इन्स्टाग्रामवर तब्बल दहा लाख फॉलोअर्स… अशा ग्लॅमर जगतात फिरणाऱ्या एका रीलस्टारने डोंबिवलीतील हायप्रोफाईल तरुणीशी जवळीक साधली. रीलस्टारने तरुणीशी गोड बोलून तिला लग्नाचे स्वप्न दाखवले. नंतर घरावर ईडीची धाड पडल्याचे नाटक रचून तिला तब्बल 92 लाख 75 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.


पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर विष्णुनगर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या फसवणुकीचा गुंता सोडवत आरोपीला बेड्या ठोकल्या. अटक झालेल्या रीलस्टारचे नाव शैलेश प्रकाश रामगुडे (वय 30) असे आहे. पोलिस तपासात शैलेशने अशाच पद्धतीने चार ते पाच तरुणींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. फसवणुकीतून मिळवलेले सोन्याचे दागिने त्याने ठाण्यातील ज्वेलर्सना विकले होते, जे पोलिसांनी जप्त केले.



इन्स्टाग्रामवरून सुरू झालेली मैत्री


पीडित तीस वर्षीय तरुणी डोंबिवली पश्चिमेतील एका उच्चभ्रू सोसायटीत कुटुंबासह राहते. तर शैलेश ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेटमधील आलिशान सॉलिटर टॉवरमध्ये राहतो. शैलेश आणि तरुणी दोघे २०२४ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले. नंतर मैत्री, जवळीक आणि प्रेमाचे नाटक… एवढ्यावरही न थांबता आरोपीने तरुणीला लग्नाचे आश्वासन दिले.


सप्टेंबर २०२४ मध्ये शैलेशने नवे नाटक रचले – घरावर ईडीची धाड पडून दोन किलो सोने आणि एक कोटी रुपये जप्त झाल्याचा दावा केला. ते सोडवण्यासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगून तरुणीकडून सोने व रोख मिळून एकूण ९२.७५ लाखांची रक्कम घेतली.


सप्टेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ या काळात तो तिच्याकडून पैसे उकळत राहिला. नंतर अचानक संबंध तोडून लग्नही न करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाल्याने पीडितेने पाच नोव्हेंबर रोजी पोलिसांकडे धाव घेतली.



श्रीमंतीचे गाजर दाखवून फसवणूक


शैलेश तरुणींना आपली लाइफस्टाईल दाखवण्यासाठी बीएमडब्ल्यू गाड्या, महागडे फोन, मॉडेलिंगचे प्रोजेक्ट्स अशा गोष्टी वापरायचा. त्याचा लूक, फॉलोअर्स आणि बोलण्याची शैली पाहून अनेक तरुणी त्याच्या जाळ्यात अडकायच्या. एकदा विश्वास बसला की लगेच पैशांची गरज असल्याचे सांगून तो त्यांच्याकडून सोनं, रोख रक्कम उकळायचा. आणि उद्देश साध्य झाला की गायब व्हायचा.


आतापर्यंत त्याने तीन तरुणींची आर्थिक फसवणूक केल्याचे समजले झाले असून एकीकडून ४३ लाख, तर दुसऱ्या प्रकरणात २९ लाख काढल्याचा तपासात उलगडा झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ३९ तोळे सोनं, एक बीएमडब्ल्यू कार आणि चार महागडे मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी अतुल झेंडे आणि सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास जलदगतीने सुरू आहे.

Comments
Add Comment

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

सकाळच्या सत्रात शेअर बाजार कोसळले 'या' कारणामुळे बाजाराचा घात? सेन्सेक्स १२७.८४ व निफ्टी ४२.७५ अंकांने घसरला

मोहित सोमण: आज सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स १२७.८४ व निफ्टी ४२.७५

रायगडच्या राजकारणाला संघर्षाची किनार

खोपोलीतील हत्याकांडाने जिल्ह्यातील जुन्या घटनांचे स्मरण सुभाष म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्याचे राजकारण

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

पश्चिम रेल्वेवर आजपासून विविध मार्गांवर रेल्वे ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेने कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी १८ जानेवारी २०२६

आरे ते कफ परेड मेट्रो रात्रभर धावणार

बुधवारी मेट्रोच्या विशेष फेऱ्यांचे नियोजन मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी