मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना अनेकदा नागरिकांकडून किल्ला परिसराचा मान राखला जात नाही. मुंबईत अशीच एक घटना घडली. वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी करण्यात आली. या पार्टीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 'प्रहार' या व्हिडीओच्या सत्यतेची पडताळणी करू शकत नाही.
व्हिडीओत हातात बिअरचे कॅन धरलेले नागरिक वांद्रे किल्ला परिसरात पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. या प्रकाराची फडणवीस सरकारने गंभीर दखल घेतली आहे. वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी करण्यासाठी कोणी परवानगी दिली याची चौकशी सुरू आहे. परवानगी देणारा अधिकारी तसेच दारू पार्टी करणारे सदस्य या सर्वांच्या विरोधात नियमानुसार कारवाई होणार असल्याचे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस म्हणाले. सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने तपास सुरू आहे. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग त्यांच्या नियमांनुसार कारवाई करत आहे. दोषींविरोधात कारवाई होईल; असे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस म्हणाले.
मुंबईत वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टीचे आयोजन कोणी केले होते याचाही तपास सुरू आहे.