प्रतिनिधी: विख्यात रिअल्टी कंपनी अनंत राज लिमिटेडने आपल्या पोर्टफोलिओ विस्तार करण्यासाठी आंध्र प्रदेशात नवेकोरे डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी ४५०० कोटी रुपये गुंतवणार आहे. आज एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार,कंपनीने म्हटले आहे की त्यांची उपकंपनी अनंत राज क्लाउड प्रायव्हेट लिमिटेड (ARCPL) ने आंध्र प्रदेशात आयटी पार्कसह नवीन डेटा सेंटर सुविधा बांधण्यासाठी आणि डेटा सेंटर आणि क्लाउड सेवांच्या विकासासाठी गुंतवणूक करण्यासाठी आंध्र प्रदेश आर्थिक विकास मंडळासोबत एक सामंजस्य करार (MoU) केला आहे.या करारा अंतर्गत डेटा सेंटर-आयटी पार्कच्या विकासासाठी ARCPL कडून सुमारे ४५०० कोटी रुपयांच्या टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीची केली जाऊ शकते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या गुंतवणुकीमुळे सुमारे ८५०० प्रत्यक्ष आणि ७५०० अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
या सामंजस्य कराराचा उद्देश राज्यात कालबद्ध पद्धतीने डेटा सेंटर-आयटी पार्क स्थापन करण्यास मदत करणे आहे. 'ARCPL सुमारे ४५०० कोटी रुपयांची थेट गुंतवणूक करेल, जी दोन टप्प्यात अंमलात आणली जाईल,असे अनंत राज म्हणाले आहेत. आंध्र प्रदेश आर्थिक विकास मंडळ (APEDB) प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सहकार्य करेल, ज्यामध्ये केंद्र सरकारशी समन्वय आणि सहभाग समाविष्ट आहे. APEDB ची भूमिका राज्यात गुंतवणूक सुलभ करणे आणि प्रोत्साहन देणे एवढी मर्यादित असेल. आंध्र प्रदेश सरकारचे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण मंत्री नारा लोकेश यांच्या उपस्थितीत शुक्रवारी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
कंपनीने दिलेल्या माहितीत, प्रस्तावित गुंतवणूक आणि विस्तार कंपनीच्या सध्या विकसित होत असलेल्या ३०७ मेगावॅट डेटा सेंटर क्षमतेपेक्षा जास्त आहे. अनंत राज लिमिटेड त्यांच्या मानेसर आणि पंचकुला येथील कॅम्पसमध्ये २८ मेगावॅट आयटी लोड चालवते आणि २०३१-३२ पर्यंत हरियाणातील मानेसर, पंचकुला आणि राय येथे एकूण क्षमता ३०७ मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवते असे म्हटले आहे.जून २०२४ मध्ये, अनंत राज यांनी भारतात क्लाउड सेवा प्रदान करण्यासाठी फ्रेंच आयटी आणि टेलिकॉम सेवा कंपनी ऑरेंज बिझनेसशी भागीदारी केली होती. कंपनीने म्हटले आहे की ते आर्थिक वर्ष २८ पर्यंत ११७ मेगावॅटची स्थापित आयटी लोड क्षमता साध्य करण्याच्या मार्गावर आहे.
आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या सहामाहीत, कंपनीने १२२३.२० कोटी रुपये महसूल आणि २६४.०८ कोटी रुपये करोत्तर नफा नोंदवला आहे.