मुंबई : आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपं म्हणजेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनीही पॅरेंट्स क्लबमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या घरी चिमुकल्या मुलीचे आगमन झाले असून दोघांनीही ही बातमी सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
दोघांच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवशीच हा सुंदर आनंद त्यांच्या आयुष्यात आला. देवाने आम्हाला दिलेलं हे सर्वात मोठं गिफ्ट आशीर्वाद दिलेत.. असं त्यांनी पोस्टमध्ये लिहित लेकीच्या जन्माची बातमी दिली. 15 नोव्हेंबर हा त्यांचा लग्नाचा वाढदिवस असल्याने या दिवशी मुलगी झाल्याचा त्यांचा आनंद अधिकच वाढला आहे.
काही महिन्यांपूर्वी ‘Baby on the Way’ असा फोटो शेअर करून ते लवकरच आई बाबा दिला होता. आता अखेर दोघांनी त्यांच्या छोट्या परीचं स्वागत झाल्याची अधिकृत घोषणा केली. चाहत्यांनीही दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची प्रेमकहाणीही रंजक आहे. ‘सिटीलाइट्स’ चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली आणि तिथून त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. जवळपास 11 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी 15 नोव्हेंबर 2021 रोजी चंदीगडमध्ये बंगाली परंपरेनुसार लग्न केलं.