संगमनेरमध्ये नाशिक-पुणे महामार्गावर मोठी कारवाई

कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्त

संगमनेर : संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असतानाच, आज (शनिवार, दि. १५) दुपारी नाशिक-पुणे महामार्गावर एका कारमधून तब्बल एक कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात, विशेषतः राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील खांडगाव फाटा येथे पोलीस पथक नियमित वाहन तपासणी करत होते. यावेळी धाराशिव पासिंग असलेल्या एमएच २५ एएस ८८५१ या क्रमांकाच्या कारला पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले. कारची झडती घेतली असता, त्यात मोठी रोख रक्कम पाहून पोलीस पथकही चक्रावून गेले.

सध्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून, अशातच एवढी मोठी रक्कम सापडल्याने हा पैसा निवडणुकीसाठी तर आणला गेला नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने या घटनेची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या कारवाईबाबत पोलीस पथकाला विचारणा केली असता, त्यांनी प्राथमिक माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, सदर कार ही संगमनेर तालुक्यातील पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रायते वाडी फाटा येथून संगमनेर शहराच्या दिशेने येत होती. कारमधील ही रक्कम धाराशिव येथील दोन बांधकाम कंपन्यांची (कन्स्ट्रक्शन कंपनी) आहे.

सध्या निळवंडे धरणाच्या कॅनॉलचे (कालवा) काम सुरू आहे. या कामावर असलेल्या कामगारांचे पगार (पेमेंट) वाटप करण्यासाठी ही रक्कम नेली जात होती, असे प्राथमिक चौकशीत समजल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

जरी ही रक्कम कामगारांच्या पगारासाठी असल्याचे सांगण्यात येत असले, तरी ऐन निवडणुकीच्या काळात इतकी मोठी रक्कम रोख स्वरूपात का नेली जात होती? यामागे आणखी काही कारण आहे का? याचा सखोल तपास पोलीस व निवडणूक अधिकारी करत आहेत. या घटनेमुळे संगमनेरमधील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.

Comments
Add Comment

सकाळच्या सत्रात शेअर बाजार कोसळले 'या' कारणामुळे बाजाराचा घात? सेन्सेक्स १२७.८४ व निफ्टी ४२.७५ अंकांने घसरला

मोहित सोमण: आज सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स १२७.८४ व निफ्टी ४२.७५

रायगडच्या राजकारणाला संघर्षाची किनार

खोपोलीतील हत्याकांडाने जिल्ह्यातील जुन्या घटनांचे स्मरण सुभाष म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्याचे राजकारण

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

पश्चिम रेल्वेवर आजपासून विविध मार्गांवर रेल्वे ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेने कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी १८ जानेवारी २०२६

आरे ते कफ परेड मेट्रो रात्रभर धावणार

बुधवारी मेट्रोच्या विशेष फेऱ्यांचे नियोजन मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी

नववर्षाच्या रात्री ‘लेट नाईट’ बेस्ट बससेवा

गेटवे ते गोराईपर्यंत बेस्टची स्पेशल राइड मुंबई : नववर्ष स्वागतासाठी बुधवारी (दि. ३१) रोजी रात्री मोठ्या