Gold Silver Rate Today: सोन्याचांदीचे दर सलग दुसऱ्यांदा तुफान गडगडले एका दिवसात सोने प्रति ग्रॅम १९६० रूपये तर चांदीत एका दिवसात ४.५०% घसरण

मोहित सोमण: जागतिक बाजारपेठेत सोने सलग दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात घसरले आहे. प्रामुख्याने युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची अपेक्षा केली जात असल्याने अचानक अनेक तज्ञांनी दरकपातीवर घुमजाव सुरु केले आहे काल फेडच्या अनेक वक्त्यांनी अचानक केलेल्या आक्रमक टिप्पण्यानंतर व्यापाऱ्यांनी डिसेंबरमध्ये फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा मागे घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोन्याचांदीत फेरफार होण्यास सुरुवात झाली आहे. या घटनांचा जागतिक पातळीवरील कमोडिटी बाजारात प्रभाव पडल्याने व भारतीय बाजारातील रेपो दरात कपातीची आशावाद कायम राहिल्याने भारतीय बाजारात सलग दुसऱ्यांदा घसरण झाली.


युएसमधील मिनियापोलिस फेडचे अध्यक्ष नील काश्कारी यांनी प्रसारमाध्यमांना म्हटले आहे की की त्यांनी गेल्या महिन्यात दर कपातीला विरोध केला होता आणि डिसेंबरमध्येही ते अनिश्चित आहेत. याव्यतिरिक्त सेंट लुईस फेडचे अध्यक्ष अल्बर्टो मुसलेम आणि क्लीव्हलँड फेडचे अध्यक्ष बेथ हॅमॅक यांनीही फेड धोरणे जास्त प्रमाणात अनुकूल होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि महागाईतील चिंता बोलून दाखवली. दरम्यान व्याजदरात कपात न झाल्यास सोन्यावरील व्याजात भर पडणार नसल्याने निराशा पसरत आज कमोडिटी बाजारातील पडझड कायम आहे.


सरकारी शटडाऊनच्या दीर्घकाळाच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट डेटाच्या अभावामुळे फेड डिसेंबरच्या बैठकीबाबत अद्याप आश्वासकता नाही. काही आकडेवारी निराशाजनक आल्याने आता उर्वरित शटडाऊनमुळे प्रलंबित झालेली आगामी आकडेवारी आधारे बाजारात प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. अद्याप मुख्य फेड गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांनीही कुठलाही नवीन संकेत दिला नाही. त्यामुळे बाजारातील सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याच्या गुंतवणूकीत आज बदल झाला नाही किंबहुना आज घसरण झाली. स्पॉट व ईटीएफमध्ये झालेल्या घसरणीमुळे भारतातही घसरण झाली आहे.


'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १९६ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १८० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १४७ रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२५०८ रुपयांवर, २२ कॅरेटसाठी ११४६५ रूपयांवर, १८ कॅरेटसाठी ९३८१ रूपयांवर पोहोचले आहेत. प्रति तोळ्यामागे दर २४ कॅरेटवर १९६० रूपये, २२ कॅरेटवर १८०० रूपये,१८ कॅरेटवर १४७० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२५०८० रूपयांवर, २२ कॅरेटसाठी ११४६४० रूपये, १८ कॅरेटसाठी ९३८१० रूपयांवर पोहोचले आहेत.


जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.३९% घसरले असून युएस बाजारातील गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत २.२०% घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति डॉलर दरपातळी ४०७९.५८ औंसवर गेली आहे. भारतीय बाजारातील कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.६४% घसरण झाली असल्याने सोने दरपातळी १२३४०० रूपयांवर पोहोचली आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १२५०८, २२ कॅरेटसाठी ११४६५ व १८ कॅरेटसाठी ९३८१ रूपयांवर पोहोचले आहेत.


चांदीच्या दरात काल किरकोळ वाढ आज घसरण


चांदीच्या दरातही आज मोठी घसरण झाली आहे. युएस बाजारातील अस्थिरता वाढल्याने सोने आज मोठ्या प्रमाणात कोसळले आहे. फेड दर कपातीचा अपेक्षाभंग सोन्याप्रमाणे चांदीतही वाढल्याने चांदीसारख्या कमोडिटीत घसरण झाली आहे. आज 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज ४.१० रूपये व प्रति किलो दरात ४१०० रुपयांनी घसरण झाली आहे. याखेरीज मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर १६९० तर प्रति किलो दर १६९००० रूपयांवर गेले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ४.२७% कोसळल्याने चांदीचा दर १५५५३० रूपयांवर व्यवहार करत आहे. संध्याकाळपर्यंत सिल्वर फ्युचर निर्देशांकात ४.६७% निर्देशांकात घसरण झाली आहे.

Comments
Add Comment

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे

Disney vs Youtube Update: युट्यूब टीव्ही दर्शकांसाठी मोठी बातमी: डिस्ने युट्यूब वादाला ब्रेक

करार अखेर संपन्न यूट्यूब टीव्हीमध्ये डिस्ने कंटेट पुन्हा पूर्ववत होणार प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय

विख्यात कंपनी अनंत राजकडून डेटा सेंटर उभारण्यासाठी ४५०० कोटी गुंतवणूकीची घोषणा

प्रतिनिधी: विख्यात रिअल्टी कंपनी अनंत राज लिमिटेडने आपल्या पोर्टफोलिओ विस्तार करण्यासाठी आंध्र प्रदेशात

अल्पावधीतच व्हॉट्सॲपला टक्कर देणारे अरताई आता नव्या स्वरुपात येणार श्रीधर वेंबूंकडून 'या' नव्या फिचरची घोषणा

प्रतिनिधी:अल्पावधीतच युजर्सला आकर्षित करून लोकप्रियता मिळवणारे झोहो कॉर्पोरेशनने नव्या फिचर्सची अधिकृत

संगमनेरमध्ये नाशिक-पुणे महामार्गावर मोठी कारवाई

कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्त संगमनेर : संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असतानाच, आज

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन