प्रतिनिधी:लोकांच्या गरजा व महागाई, रोजगार निर्मिती यावर निर्णय न घेता राष्ट्रीय धोरण, एच१बी व्हिसा, व्यापारी तडजोड, टॅरिफविषयक, इतर राष्ट्रीय मुद्यांना डोनाल्ड ट्रम्प हात घालत असताना देशातील नागरिकांची नाराजी ओढवून घेतली आहे. किंबहुना महागाईच्या प्रश्नावर न बोलता केवळ परराष्ट्र संबंधावर राजकारण करणाऱ्या ट्रम्प यांना व्यापारी दबावामुळे काही उत्पादनवरील अतिरिक्त शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन निर्णयामुळे आता भारतातील आंबा, चहा, डाळिंब यावरील अतिरिक्त टॅरिफ हटवण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे.
यापूर्वी युएसने भारतावर २५% टॅरिफ शुल्क आकारले होते मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणातील इतर मुद्यांसह रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अतिरिक्त २५% कर भारतीय सामानावर लावला होता. अर्थात जेनेरिक औषधे, सर्वसमावेशक औषधे, व इतकं काही पदार्थ वगळता इतर वस्तूंवर अतिरिक्त कर लादला गेला होता. अर्थात याबाबत मुळातच बेरोजगारी, महागाईच्या गर्तेतील युएस प्रशासनाला आता अंतर्गत संघर्षाचा सामना करावा लागत आहे
नुकत्याच न्यूयॉर्क महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला पराभव पत्करावा लागल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हा संबंधित उत्पादनावर कर माफ केला आहे. वस्तूंचा तुटवडा व महागाईचा अंतर्गत फटका बसला असताना आता आंबा, डाळिंब, चहा, मसाले, ज्यूस, कॉफी, संत्री, कोकोआ या उत्पादनावर ही सवलत मिळाली आहे. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, या उत्पादनावर आता टॅरिफ लागणार नाही. सातत्याने डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर ट्रम्प प्रशासनाला धारेवर धरत आहेत.
न्यूयॉर्क शहर, न्यू जर्सी आणि व्हर्जिनियामधील अलिकडच्या निवडणुकीत डेमोक्रॅट्सनी या निराशेचा फायदा घेतला आणि सामान्य कुटुंबांना त्यांचे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे या आधारावर सिनेटसह स्थानिक पातळीवर या मुद्यावर प्रचार केला होता.
'ट्रम्प यांनी आपला बराचसा वेळ परराष्ट्र धोरण आणि व्यापार युद्धांवर घालवला आहे, परंतु मतदारांना आठवड्याच्या किराणा बिलाची जास्त काळजी आहे. या आठवड्यात झालेल्या परदेशी मीडिया पोलमध्ये, ६३% नोंदणीकृत मतदारांनी सांगितले की ट्रम्प राहणीमानाचा खर्च किंवा अर्थव्यवस्था हाताळण्याच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत.' अशी टीका ट्रम्प यांच्यावर विरोधी पक्षाने केली होती. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जवळजवळ एक तृतीयांश रिपब्लिकन पक्षातलेच सिनेटर याविषयी सहमत झाले होते.
आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये महागाई लक्ष्य किंमतीतील ३% असली तरी परंतु अन्न स्वस्त झालेले नाही. अन्नाच्या किंमतीत महागाई वाढतच आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉफी जवळजवळ १९% गोमांस आणि वासराचे मांस सुमारे १५% वाढले आहे, असे सरकारी आकडेवारीवरून दिसून आले आहे. अमेरिकेतील भारतीय किराणा दुकानांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मसाल्यांच्या आणि आयात केलेल्या भारतीय पदार्थांच्या किमतीत सुमारे ३०% वाढ झाल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी दिली होती. याचा मागोवा घेत ट्रम्प यांनी हा मोठा निर्णय नाइलाजाने घेतला आहे
भारतीय आंबा आणि डाळिंबाची अमेरिकेत निर्यात वाढवण्यासाठी अमेरिकेने घेतलेल्या उपाययोजनांबद्दल भारतानेही सरकारात्मकता व्यक्त केली आहे.