मोहित सोमण:आज सकाळच्या सत्रात बिहार निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर स्वाभाविकपणे घसरण झाली आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात सेन्सेक्स २१५.६७ अंकांने व निफ्टी ७१.१५ अंकाने घसरला आहे. प्रामुख्याने आज शेअर बाजारातील सावधगिरीचे पाऊल गुंतवणूकदारांसाठी 'संजीवनी' ठरू शकते सकाळच्या सत्रात इंट्राडे नफा बुकिंग करुन अखेरच्या सत्रात बाजारात रॅलीची अपेक्षा गुंतवणूकदार करत आहेत. सकाळच्या सत्रात स्मॉल कॅप व लार्जकॅपमध्ये घसरण सुरू असताना मिडकॅप निर्देशांकात वाढ झालेली आहे. विशेषतः आज बँक व फायनांशियल सर्विसेस शेअर्समध्ये झालेली वाढ आज बाजारात अखेरपर्यंत सपोर्ट लेवल मिळण्यास मदत करु शकते. मात्र बँक निफ्टी कालच्या 'हाय' नंतर आज कंसोलिडेशन प्रकारात दिसत असल्याने बाजारात रॅलीत मदत होईल का ते बँकांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक झालेल्या पँटर्नमुळे कठेल. दरम्यान निफ्टी व्यापक निर्देशांकात मिडकॅप ५० (०.४७%), मिडकॅप नेक्स्ट ५० (०.४०%), मिडकॅप १०० (०.४४%), मिड कॅप १५० (०.३५%) निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली असून घसरण मात्र केवळ मायक्रोकॅप (०.१८%) निर्देशांकात दिसत आहे. तसेच निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ पीएसयु बँक (०.८८%), मिडिया (०.३५%), फार्मा (०.४६%), तेल व गॅस (०.५७%), मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.८०%) निर्देशांकात झाली आहे. सर्वाधिक घसरण मात्र मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.२८%),आयटी (०.८२%),ऑटो (०.११%) निर्देशांकात झाली आहे.
आज बिहार विधानसभा निवडणुकीत तज्ञांच्या यापूर्वीच्या विश्लेषणानुसार भाजपप्रणित एनडीए जिंकू शकते असा कयास मांडला होता. आज सकाळच्या निवडणूकीतील सुरूवातीच्या निकालातदेखील हेच संकेत मिळत आहेत. भाजप व मित्रपक्ष यांना सकाळी ९.४० वाजता १५४ जागांवर आघाडी मिळाली असून महागठबंधनला ८२ जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे सुरूवातीच्या कलात भाजपने स्पष्ट बहुमताची मॅजिक फिगर कधीच गाठल्याने एनडीए सुरक्षित क्षेत्रात पोहोचली आहे. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या उत्सवात आणखी भर पडू शकतो तर गेल्या तीन दिवसात भारतीय गुंतवणूकदारांसह परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांंनी गुंतवणूक वाढवण्यास सुरुवात केल्यानंतर बाजारात सकारात्मकता झळकत आहे. पोषक जागतिक पातळीवरील वातावरणाचा फायदा आज शेअर बाजारात होऊ शकतो तथापि आज भरभरून येणारे तिमाही निकाल व संबंधित घडामोडी बाजारात प्रभाव पाडू शकतात.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ मुथुट फायनान्स (९.०६%), ज्यूब्लिंएट फूडस (६.८९%), गोदावरी पॉवर (६.७४%), भारत डायनामिक्स (६.४३%), झेन टेक्नॉलॉजी (४.३५%), सॅजिलिटी (३.४९%), गार्डन रीच (३.२५%), एचबीएल इंजिनिअरिंग (३.१२%), उषा मार्टिन (२.७३%) समभागात वाढ झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण सोनाटा सॉफ्टवेअर (५.३९%),अकुम्स ड्रग्स (४.७३%), न्यू इंडिया अँन्शुरन्स (२.५०%), ट्रायडंट (२.२९%), न्यूजेन सॉफ्टवेअर (२.०१%), गोदरेज अँग्रोवेट (१.९५%), पेट्रोनेट एलएनजी (१.९५%), एसआरएफ (१.७९%), इमामी (१.७४%), इन्फोसिस (१.४३%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'आज बिहार निवडणुकीच्या निकालावर बाजाराचे लक्ष असेल. परंतु निवडणुकीच्या निकालांवर बाजाराची प्रतिक्रिया तात्पुरती असेल, निकाल काहीही असोत. बाजाराचा मध्यम ते दीर्घकालीन कल मूलभूत गोष्टींवर, विशेषतः उत्पन्न वाढीवर अवलंबून असेल. या आघाडीवर आशावादाला वाव आहे, जो मजबूत जीडीपी वाढ आणि उत्पन्न वाढीत सुधारणा होण्याच्या शक्यतांवरून दिसून येतो.
या वर्षी भारताची खराब कामगिरी टिकण्याची शक्यता कमी आहे. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की निफ्टीच्या मोठ्या खराब कामगिरी असूनही, या वर्षी आतापर्यंत, गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत निफ्टी जगातील मोठ्या बाजारपेठांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा निर्देशांक आहे. आर्थिक वर्ष २५ मध्ये कॉर्पोरेट कमाईतील घसरण आणि वाढलेले मूल्यांकन या वर्षी बाजारावर परिणाम करत आहे. भविष्यात, बाजाराची ही रचना चांगल्यासाठी बदलणार आहे.'
आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,' निफ्टी २५९८० पातळीच्या वर काही काळासाठी पोहोचल्यानंतर खाली आला, ज्यामुळे कालच्या सावधगिरीच्या संकेताची पुष्टी झाली. २६१३०-२६५५० पातळीच्या वरच्या ट्रेंडमधील विस्तार अजूनही जिवंत आहे, कारण ऑसिलेटरने अद्याप ट्रेंड उलटण्याचे संकेत दिलेले नाहीत. तथापि, नकारात्मक बाजू २५७८९ पातळीच्या दिशेने वर खेचली जाऊ शकते.'