स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा


मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा दिलासा दिला आहे. शिवसेनेच्या पक्षचिन्हावरून वाद सुरू असतानाच शरद पवारांना पक्षचिन्हावरून मोठा दिलासा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला साधर्म्य नाव असणाऱ्या पिपाणी (ट्रम्पेट) चिन्हामुळे फटका बसला होता. पिपाणी हे चिन्ह गोठविण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत होती. अखेर निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य करीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह वगळले आहे.

चिन्ह साधर्म्याचा फटका आता बसणार नाही


हा शरद पवारांच्या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वापरता येणार नाही. त्यामुळे यापूर्वी शरद पवारांच्या पक्षाने केलेल्या दाव्याप्रमाणे त्यांना जसा या चिन्ह साधर्म्यामुळे फटका बसला, तसा कोणताही प्रकार आता होणार नाही.

बेलापूरमध्ये निसटता पराभव


बेलापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक हे अवघ्या ३७७ मतांनी पराभूत झाले. त्यावेळी पिपाणी (ट्रम्पेट) चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने तब्बल अडीच हजारांहून अधिक मते घेतल्याने संदीप नाईकांचा पराभव झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आला होता.

विधानसभेला ९ जागांवर बसला फटका


पिपाणी (ट्रम्पेट) चिन्हामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. या चिन्हाच्या गोंधळामुळे मतदारांनी चुकीच्या चिन्हावर (पिपाणी) मतदान केले, ज्यामुळे पक्षाच्या तुतारी चिन्हाला मतांचे विभाजन झाले आणि ९ जागांवर उमेदवार पराभूत झाल्याचे आकडेवारी दाखवत सांगण्यात आले. या जागांवर पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवारांना मिळालेली मते पराभवाच्या फरकापेक्षा जास्त होती, ज्यामुळे पक्षाला हानी पोहोचली.
Comments
Add Comment

Milk Price Hike : सर्वसामान्यांना महागाईचा नवा झटका; गाई-म्हशीचे दूध महागले! ११ ऑगस्टपासून नवे दर लागू

महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. डिझेल, साखर आणि पॅकिंग

Pune News : मुळा-मुठा नदीपात्रात १ दिवसाच्या चिमुरडीचा मृतदेह; खराडीतील घटनेने पुणे हादरले!

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. मुळा-मुठा

Jalgaon Airport : जळगाव विमानतळ विस्ताराला वेग ! जमीन मोजणी तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Jalgaon Airport : जळगाव विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. विमानतळ

Pune Traffic Alert: पुणेकरांनो, आज घराबाहेर पडताना सावधान! महामोर्चामुळे ‘या’ मार्गांवर वाहतूक बंद; जाणून घ्या पर्यायी रस्ते

पुणे : पुणेकरांसाठी आजचा दिवस वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Ahilyanagar Crime News : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, मुकादमाच्या मुलावर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील एका गावातील