मराठी कथा, पटकथा आणि रंगमंचाचा जादूगार - कपिल भोपटकर

मराठी रंगभूमी व टेलिव्हिजन जगतात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे लेखक - दिग्दर्शक कपिल भोपटकर सध्या त्यांच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'असंभव' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. मराठी रंगभूमी आणि टेलिव्हिजन क्षेत्रात गेली तीन दशके आपल्या लेखणीतून आणि कल्पनाशक्तीतून त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे.


१९९०च्या दशकात पोद्दार कॉलेजमध्ये विद्यार्थी असताना त्यांनी सात एकांकिका लिहिल्या, आंतरकॉलेज स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार जिंकले. त्यांची पहिली एकांकिका 'जल्लोष' आता 'झेप' या पटकथेत रूपांतरित होत असून लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


कपिल यांचा व्यावसायिक प्रवास प्रसिद्ध पटकथाकार सब्यसाची देब बर्मन यांच्या 'शांती' या मालिकेसाठी सहाय्यक संवादलेखक म्हणून सुरू झाला. १९९८ मध्ये कपिल त्यांनी विश्राम बेडेकर यांच्या साहित्याचा मानदंड ठरलेल्या 'रणांगण' या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे रंगमंचीय रूपांतर केले आणि पुढे या नाटकाने अनेक प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले. रिचर्ड बाक यांच्या ‘जोनाथन लिविंगस्टोन सिगल' या पुस्तकाचे मराठी नाट्यरूपांतर दिग्दर्शित केले आणि १९९९ मध्ये मानाची 'सवाई ट्रॉफी' जिंकली. या प्रयोगातून प्रियदर्शन जाधव, जितेंद्र जोशी, मधुरा वेलणकर आणि सिद्धार्थ जाधव यांसारख्या आजच्या लोकप्रिय कलाकारांचा प्रवास सुरू झाला.


टेलिव्हिजन विश्वात त्यांनी 'सनसनी' या मानसशास्त्रीय थ्रिलर मालिकेपासून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. अल्फा मराठीवरील ‘आक्रीत’ मालिकेचे लेखन केले, ज्याला नामांकन मिळाले होते. त्यानंतर श्रावणसरी, कगार आणि थरार अशा मालिकांमधून लेखन आणि पटकथेत नवे प्रयोग केले. विशेष म्हणजे त्यांनी दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या 'माझा खेळ मांडू दे' या नाटकाचं पटकथेत रूपांतर करून 'रैन बसेरा' ही टेलिफिल्म लिहिली, ज्यात किरण खेर मुख्य भूमिकेत झळकल्या. तर २०२५ मध्ये झी फायवर प्रदर्शित झालेली मराठीतील पहिली वेबसीरिज ‘अंधारमाया’ याची पटकथाही कपिल यांनी लिहिली आहे.


कपिल भोपटकर यांच्या लेखनातून वास्तव, भावना आणि मानवी नात्यांचं सूक्ष्म चित्रण नेहमीच जाणवते. ते केवळ लेखक किंवा दिग्दर्शक नाहीत तर कथा सांगण्यात, पात्रांना जिवंत करण्यात आणि प्रत्येक फ्रेममध्ये भावनिक गुंतवणूक निर्माण करण्यात पारंगत आहेत. त्यांच्या हातून आलेली प्रत्येक कथा, पटकथा प्रेक्षकांना फक्त मनोरंजन नाही तर एक अनुभव देणारी असते.


'असंभव' या चित्रपटाची कथा, पटकथा कपिल भोपटकर यांनी लिहिली असून येत्या २१ नोव्हेंबर रोजी 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया'मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा मुंबई : यंदाचे वर्ष (२०२६)

गोव्यातील एक बीच, एकच वेळ … कार्तिक आर्यनसोबत कोण होती ही ‘मिस्ट्री गर्ल’?

मुंबई : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून समोर आलेल्या काही फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय