मोहित सोमण: आज जागतिक अस्थिरतेच्या काळात किरकोळ दिलासा मिळाल्याने आज सोन्यात मोठी घसरण झाली असून चांदीत मात्र किरकोळ वाढ झाली आहे. जागतिक पातळीवरील युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची वाढलेली आशा, जागतिक भूराजकीय परिस्थितीतील अनुकुलता, व स्पॉट बाजारात सोन्याच्या गुंतवणूकीतील मागणी घटल्याने जागतिक सोन्याच्या दरात आज दिवसभरात घसरण कायम होती. भारतीय सराफा बाजारातही दिवसभरात मोठी घसरण झाली आहे.' गुड रिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १६१ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १४५ रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११९ रुपये घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२७०४ रूपये, २२ कॅरेटसाठी ११६४५ व १८ कॅरेटसाठी ९५२८ रूपयांवर पोहोचले आहेत.
संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १६१० रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १४५० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ११९० रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२७००० रूपये, २२ कॅरेटसाठी ११६४५० रूपये, १८ कॅरेटसाठी ९५२८० रुपयांवर पोहोचले आहेत. माहितीनुसार, मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १२७०४, २२ कॅरेटसाठी ११७४०, १८ कॅरेटसाठी ९७९० रूपयावर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.२३% घसरण झाली असून दरपातळी १२५१९४ रूपयांवर पोहोचले आहेत.
जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत १.१०% घसरण झाली असून जागतिक सोन्याचा मानक (Gold Standard Rate) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.६४% घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति डॉलर दरपातळी ४१४३.५४ औंसवर गेली आहे. आज डॉलरच्या तुलनेत रूपयात ३ पैशाने किरकोळ घसरण झाली त्यामुळे सोन्याच्या निर्देशांकात त्याचा फारसा प्रभाव पडला नाही किंबहुना जागतिक पुरवठा साखळीत सोन्याच्या स्थिर व सुरक्षित गुंतवणूक समजल्या जाणाऱ्या सोन्याच्या गुंतवणूकीत आज घसरण झाल्याने बाजाराचे दर नियंत्रित झाले आहेत. मुख्यतः डिसेंबर महिन्यात युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात ५० बेसिसवर कपातीची व भारतीय बाजारात रेपो दरात कपातीची शक्यता वर्तवली जात असताना ग्राहकांच्या उपभोगातही मोठी वाढ झाली असली तरी अस्थिरतेचा तोंडावर सोन्याच्या गुंतवणूकीत मोठी वाढ झाली होती. मात्र हा पॅटर्न आता बदलून मागणीत घसरण सुरू झाली आहे.
आज सोन्याच्या दरात दिवसभरात घसरण झाली असली तरी ती संध्याकाळनंतर वाढीत बदलायची शक्यता तज्ञ दर्शवत आहेत कारण फेड दरावर कुठलीही निश्चितता नसल्याने बाजारात अस्थिरता कायम आहे. काही तज्ञांच्या मते ५० बेसिस पूर्णांकाने तर काही तज्ञांच्या मते ही २५ पूर्णांक होऊ शकते असे असताना गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा दिला जात आहे.
सोन्याच्या टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'काल संध्याकाळी झालेल्या विक्रीनंतर सोन्याचे भाव कमकुवत राहिले, कारण फेडरल रिझर्व्ह सदस्यांनी सुचवले आहे की नवीन आर्थिक डेटाच्या अभावामुळे पुढील दर कपातीला विलंब होऊ शकतो, त्यामुळे सोन्याच्या भावात मंदी आली. डॉलर निर्देशांक मजबूत झाला, ज्यामुळे सोन्यावर अतिरिक्त दबाव निर्माण झाला. या आठवड्याच्या १२७००० रूपयांच्या उच्चांकावरून किमती १२५६०० रूपयांवर घसरल्या परंतु तरीही आठवड्यातून सुमारे ४% वाढ झाली आहे. सोने १२४००० ते १२७५०० रूपयांच्या श्रेणीत अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.'
चांदीच्या दरात मात्र वाढ दिवसभरात कायम
चांदीच्या दरात मात्र आज वाढ झाली आहे. विशेषतः कमकुवत कामगार बाजाराच्या आकडेवारीनंतर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून लवकरच दर कपात होण्याची अपेक्षा वाढली असली तरी आज चांदीच्या किमती ४.७९% ने वाढून १६२०९१ वर स्थिरावल्या आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ADP आकडेवारी पाहता अमेरिकेतील खाजगी उद्योजक अथवा कंपन्यानी ऑक्टोबरच्या अखेरीस दर आठवड्याला सरासरी ११२५० नोकऱ्यांची कपात केली आहे ज्यात आज अमेझॉनचा भर पडला. असलेली परिस्थिती सुधारण्यासाठी फेड डिसेंबरमध्ये दर कमी करू शकेल असे मत बाजारात चलतीत आहे.
मात्र बाजारातील सहभागी आता २५-बेसिस-पॉइंट कपातीची शक्यता ६८% दर्शवितात जी पूर्वी ६२% होती, तर युएस फेडचे गव्हर्नर स्टीफन मिरन यांनी ५०-बेसिस-पॉइंट कपात करण्याच्या मोठ्या आवाहनामुळे तेजीच्या भावनेला आणखी गती मिळाली. दिवसभ रात चांदीच्या स्पॉट फ्युचर बाजारात मागणी वाढल्याने चांदी आज किरकोळ उसळली. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज ०.१० रूपयांनी वाढ झाली असून प्रति किलो दरात १०० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर १७३.१० रुपये व प्रति किलो दर १७३१०० रुपयांवर पोहोचले आहेत. संकेतस्थळावरील माहितीनुसार, मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचा प्रति १० ग्रॅम सरासरी दर १७३१ रूपये, तर प्रति किलो दर १७३१०० रूपयांवर व्यवहार करत आहे. कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत आज १.७९% घसरण झाल्याने दरपातळी १५९५५९ रुपयांवर गेली आहे.
जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.६७% घसरण झाली असून कमकुवत कामगार बाजार आकडेवारीनंतर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून लवकरच दर कपातीची अपेक्षा वाढल्याने चांदीच्या किमती ४.७९% ने वाढून १६२०९१ पातळीवर स्थिरावल्या.