मेटल रिअल्टी वाढीसह शेअर बाजारात किरकोळ वाढ कायम अखेर 'रिकव्हरी' मात्र नक्की पडद्यामागे बाजारात काय चाललंय? जाणून घ्या सविस्तर विश्लेषण

मोहित सोमण:शेअर बाजारात सकारात्मकता कायम असली तरी आज जबरदस्त अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात किरकोळ वाढ झाली आहे. प्रामुख्याने आज बाजारातील मिडकॅपसह स्मॉलकॅपमध्ये अधिक अस्थिरता (Volatility) नोंदवली गेल्याने बाजारात अधिक रॅली झाली नाही परंतु लार्जकॅपही (०.०१%) सपाट पातळीवर राहिली. दुसरीकडे बँक निफ्टीने नवा रेकॉर्ड केला असताना सेन्सेक्स बँक निर्देशांकाने वाढ नोंदवली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील बऱ्याच निर्देशांकात घसरण झाली असली तरी मेटल (०.४४%), फार्मा (०.४१%), रिअल्टी (०.४२%) शेअर्समध्ये झालेल्या वाढीच्या जोरावर बाजार 'हिरव्या' रंगात बंद झाले आहे. तसेच आयटी (०.४८%) निर्देशांकात मात्र तीन दिवसांच्या रॅलीनंतर आज घसरण झाली असून पीएसयु बँक (०.६८%), मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.४९%), केमिकल्स (०.५३%) निर्देशांकात घसरण झाली आहे. व्यापक निफ्टी निर्देशांकातील मिडकॅप १०० (०.३५%),स्मॉलकॅप १०० (०.३७%), स्मॉलकॅप २५० (०.४०%) निर्देशांकात अधिक घसरण झाली आहे. प्रामुख्याने आज नफा बुकिंगही मोठ्या प्रमाणात झाले आहे


दिवसभरात अस्थिरता कायम असतानाही आज घरगुती गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक राखल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) यांनी केलेल्या विक्रीने झालेली घट भरून निघू शकते. तसेच भारतीय व्याजदरात (रेपो दरात) कपात होणार या आशेने आगामी दिवसात बँक निर्देशांकात तेजी राहण्याची शक्यता आहे. मात्र भारत व युएस यांच्यातील टॅरिफ मुद्यावर 'सस्पेन्स' कायम आहे तरीही भारत सरकारने हजारो कोटींची योजना एमएसएमई व निर्यातदारांसाठी घोषित केल्याने उद्योगांना दिलासा मिळू शकतो. दरम्यान गुंतवणूकदारांचा आगामी सीपीआय आकडेवारी, मूडीज अहवाल, गेल्या दोन दिवसातील सकारात्मक तिमाही निकाल याआधारे रॅलीसाठी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीही गुंतवणूकदार आगामी भूराजकीय स्थितीतील अस्थिरतेच्या आधारे सावध राहू शकतात ज्याचा परिणाम अधिक पातळीवर कमोडिटी व चलनी बाजारात दिसू शकतो. याखेरीज आज दिवसभरात चलनी बाजारात रूपयात आजही ७ रूपयांनी घसरण झाली आहे. डॉलर निर्देशांकात आजही वाढ झाल्याने आज सोन्याचांदीच्या दरात जबरदस्त वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या बाबतीत मागणीत घट झाल्याने दर स्वस्त झाल्याचे जागतिक पातळीवरील दुपारपर्यंत दिसून आले आहे.


आज अखेरच्या सत्रात आशियाई बाजारात संमिश्र कल राहिले आहेत. गिफ्ट निफ्टी (०.१३%) सह तैवान वेटेड (०.१६%), जकार्ता कंपोझिट (०.२०%) बाजारात घसरण झाली असली तरी इतर बाजारात वाढ झाली आहे ज्यामध्ये सर्वाधिक वाढ शांघाई कंपोझिट (०.७३%), हेंगसेंग (०.५५%), निकेयी २२५ (०.२५%), कोसपी (०.४९%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.२१%), एस अँड पी ५०० (०.०६%) बाजारात वाढ झाली असून नासडाक (०.३७%) बाजारात घसरण झाली आहे. आज शेअर बाजारात किरकोळ वाढ झाली असली तरी बीएसई (Bombay Stock Exchange BSE) ४३६७ शेअर्सपैकी १८४७ शेअर्समध्ये वाढ झाली असून २३८१ शेअर्समध्ये मात्र घसरण झाली आहे. एनएसईत ३१८७ शेअरपैकी १३६७ शेअर्समध्ये वाढ झाली असून १७३२ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बीएसईत १७६ शेअर अप्पर सर्किटवर पोहोचले असून १९४ शेअर लोअर सर्किटवर पोहोचले आहेत. एनएसईत ९५ शेअर अप्पर सर्किटवर पोहोचले असून ६२ शेअर लोअर सर्किटवर पोहोचले आहेत.


आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ डेटा पँटर्न (७.५६%), वालोर इस्टेट (६.३६%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (५.९६%), अशोक लेलँड (५.५३%), सेंच्युरी फ्लायबोर्ड (४.६७%), फाईव स्टार बस फायनान्स (४.४५%), एशियन पेंटस (३.९६%), सिग्नेचर ग्लोबल (३.४७%), एबी लाईफस्टाईल (३.४३%) समभागात झाली आहे.


आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण कोहान्स लाईफ (८.८१%), एन्ड्युरन्स टेक (७.७१%), लेमन ट्री हॉटेल (४.९३%), कोचीन शिपयार्ड (४.७३%), तेजस नेटवर्क (४.२९%), उषा मार्टिन (४.१६%), ज्योती सीएनसी ऑटो (३.९९%), इटर्नल (३.५८%), स्विगी (३.२०%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' सकारात्मक सत्रानंतर राष्ट्रीय शेअर बाजार स्थिर स्थितीत बंद झाले, कारण आशावादी जागतिक आणि देशांतर्गत संकेत असूनही नफा-वसुलीने सुरुवातीच्या वाढीला आळा घातला. ट्रम्प यांनी अमेरिकन सरकारच्या शटडाऊनला संपवण्यासाठी अल्पकालीन निधी विधेयकावर स्वाक्षरी केल्याने आणि भारतासाठी कर सवलतीची आशा निर्माण झाल्यामुळे भावना वाढल्या. ऑक्टोबरमधील विक्रमी कमी चलनवाढीमुळे आरबीआयकडून दर कपातीची अपेक्षा बळावली, ज्यामुळे धातू आणि रिअल्टी सारख्या व्याजदर-संवेदनशील क्षेत्रे गुंतवणूकदारांसाठी आकर्षक बनली. तथापि, एफआयआयकडून सतत बाहेर पडणाऱ्या प्रवाहादरम्यान आणि कमकुवत रुपयाच्या दरम्यान, बिहार निवडणूक निकालांपूर्वी नफा-वसुली उच्च पातळीवर दिसून आली'


आजच्या बाजारातील रुपयांच्या हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,' शुक्रवारी सकाळी होणाऱ्या बिहार निवडणुकीच्या निकालापूर्वी बाजारातील सहभागी सावध राहिल्यामुळे रुपया ८८.६७ रूपयांच्या जवळ एका अरुंद श्रेणीत स्थिर राहिला, ज्यामुळे व्यापारी सत्र मंदावले. याव्यतिरिक्त,व्यापारी अमेरिकन सीपीआय डेटाच्या प्रकाशनाची वाट पाहत होते, ज्यामुळे डॉलर निर्देशांकाच्या हालचालींवर आणि परिणामी रुपयाच्या ट्रेंडवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. दरम्यानच्या काळात मर्यादित ट्रिगर्ससह, रुपया श्रेणीबद्ध राहण्याची शक्यता आहे, व्यापार श्रेणी ८८.४०-८८.९५ दरम्यान अपेक्षित आहे.'

Comments
Add Comment

एनएसईवर २४ कोटी खात्यांचा टप्पा ओलांडला गेला गुंतवणूकदार वाढीत २२ वर्षातील नवा उच्चांक प्रस्थापित!

मुंबई: नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) कडून नोव्हेंबर २०२५ मध्ये आणखी एक टप्पा गाठला गेला आहे. एक्सचेंजने

भारताकडून ४५०६० कोटींच्या जाहीर केलेल्या निर्यात प्रोत्साहन योजनेवर जीटीआरआयकडून 'या' नव्या चिंता व्यक्त

प्रतिनिधी: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% पातळीवर लादलेल्या कराला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी

किआ इंडियाने किआ आणि मल्टीब्रँड वाहनांसाठी नवीन वॉरंटी प्लॅनसह व्यवसायात मजबूती नोंदवली

किआ इंडियाने किआ मेक प्री-मालकीच्या कारचे प्रमाणपत्र वय ५ वर्षांवरून ७ वर्षांपर्यंत वाढवले आहे, २४ महिने किंवा

Priyanka Chopra : अहा! हातात बंदूक अन् पायात कोल्हापुरी, काशीबाईनंतर प्रियांका चोप्राच्या मराठमोळ्या लूकने घातला धुमाकूळ!

मुंबई : बॉलिवूडची ग्लोबल आयकॉन अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आता तिच्या आगामी आणि बहुप्रतिक्षित

दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा : हल्ल्याचे संपूर्ण ब्लूप्रिंट आले समोर !

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे सरकत आहे, तसतसे नवनवीन आणि धक्कादायक

बँक निफ्टीत रेकॉर्ड ब्रेक वाढ! ५८६१५.२० पातळीही ओलांडली 'या' कारणांमुळे

मोहित सोमण: बँक निफ्टीने आज रेकॉर्डब्रेक पातळी दुपारी ओलांडली आहे. दुपारी ३.२१ वाजेपर्यंत बँक निफ्टीने आज