लक्ष्य सेनची जपान मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा सहज पराभव


नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुममातो मास्टर्स जपान बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. त्याने गुरुवारी (दि. १३) झालेल्या सामन्यात सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा सरळ फेरीमध्ये पराभव करून आपले स्थान पक्के केले. मात्र, दुसरीकडे भारताचा अनुभवी खेळाडू एच.एस. प्रणॉय याचा प्रवास दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आला. प्रणॉयला ४६ मिनिटे चाललेल्या या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या रासमस गेम्केकडून १८-२१, १५-२१ अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.


सन २०२१ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा कांस्यपदक विजेता असलेल्या लक्ष्य सेनने जगातील २० व्या क्रमांकाच्या तेहवर ३९ मिनिटांत २१-१३, २१-११ असा सहज विजय मिळवला. संपूर्ण सामन्यात लक्ष्यचेच वर्चस्व पाहायला मिळाले. त्याने सिंगापूरच्या खेळाडूला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. आता उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेनची लढत जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानी असलेल्या सिंगापूरच्या माजी विश्वविजेत्या लोह कीन यू याच्याशी होणार आहे.


उपांत्यपूर्व फेरीतमध्ये लक्ष्यने पहिल्या गेममध्ये ८-५ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर तेहने थोड्या वेळासाठी १०-९ अशी नाममात्र आघाडी घेतली असली तरी, ब्रेकपर्यंत भारतीय खेळाडूने पुन्हा आघाडी मिळवली. १४-१३ अशा स्कोअरपर्यंत दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत झाली, पण यानंतर लक्ष्यने सलग सात गुण मिळवून पहिला गेम आपल्या नावावर केला.



सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळ


दुसऱ्या गेममध्येही लक्ष्यने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळ दाखवला आणि लवकरच ५-० अशी आघाडी घेतली. इंटरव्हलपर्यंत त्याने ११-३ अशी मोठी आघाडी घेऊन आपल्या प्रतिस्पर्धकाच्या आशा धुळीस मिळवल्या. यानंतरही भारतीय खेळाडूने आपली लय कायम ठेवली आणि सहजपणे सामना जिंकला.



आतापर्यंतचा प्रवास


यापूर्वी, लक्ष्य सेनने जपानच्या कोकी वतानबेचा सरळ गेममध्ये पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. जपानच्या जागतिक क्रमवारीत २६व्या स्थानी असलेल्या वतानबेला याचाही लक्ष्यने केवळ ३९ मिनिटांत २१-१२, २१-१६ अशा फरकाने पराभव केला होता.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात