रस्त्यात तुटलेला पाय, बाजूला साखरेचं पोतं, इंदापूरमध्ये नेमका काय प्रकार?

पुणे: कळंब-निमसाखर मार्गावर एका व्यक्तीचा गुडघ्यापासून तोडलेला पाय सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर हद्दीत राज्यमार्गाच्या साईडपट्टीवर उघडकीस आला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उरलेले शरीर शोधण्यासाठी परिसरात शोधमोहीम सुरू केली असून हा पाय साधारण ४५ ते ५० वयोगटातील पुरुषाचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पायात पांढरा सॉक्स होता आणि परिसरात साखरेचे रिकामे पोतेही आढळून आले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास वालचंदनगर पोलीस स्टेशनला रस्त्यात पाय आढळून आल्याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच, वालचंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना गुडघ्यापासून तोडलेला पाय दिसला. या तोडलेल्या पायाच्या काही अंतरावर ५० किलो क्षमतेचे साखरेचे रिकामे प्लास्टिक पोते आढळले. या प्रकरणी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली.




पोलिसांनी राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूला, उसाच्या शेतात, डाळिंब आणि इतर पिकांमध्ये, तसेच गटारींमध्ये आणि नीरा नदीवरील पुलाजवळही शोध घेतला. परंतु, त्यांना अद्याप कोणतेच धागेदोरे मिळालेले नाहीत. या शोधमोहिमेत वालचंदनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी, स्थानिक पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत. बारामती विभागाच्या फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, जर कोणाला या सावळ्या रंगाच्या वर्णनानुसार काही माहिती मिळाली, तर त्यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

हार्दिक पंड्या लवकरच मैदानात; टीम इंडियात पुनरागमनाआधी खेळणार बडोद्यासाठी

मुंबई : भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. आशिया कप 2025

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ साठी १२ संघ खेळणार

कसोटी क्रिकेट दोन भागांत विभागले जाणार नाही नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ मधील सामने सध्या

भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना सकाळी ९ वाजेपासून

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका

‘स्थानिक’निवडणुकांसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश मुंबई : निवडणूक आयोगाकडून राज्यात

बांगलादेशला परतण्यास शेख हसीनांची सशर्त तयारी

नवी दिल्ली : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या देशात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण,

६५ व्या वर्षी 'आयर्नमॅन'चा बहुमान! गोवा येथे झालेल्या ७०.३ आयर्नमॅन स्पर्धेत आष्टा येथील डॉ. अरुण सरडे यांची विक्रमी कामगिरी

दोडामार्ग : जिद्द, मेहनत आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या बळावर कोणतीही गोष्ट अशक्य नसते, हे सांगली जिल्ह्यातील