Hindustan Aeronautics Limited Q2FY26 Results: हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा आर्थिक तिमाही निकाल जाहीर कंपनीच्या ऑपरेशनल कामगिरीत जबरदस्त वाढ निव्वळ नफ्यात १०% वाढ

मोहित सोमण:हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर निव्वळ नफ्यात मोठी वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या १६६९ कोटी तुलनेत (१३७७१५ लक्ष) तुलनेत या तिमाहीत कंपनीला १६६२५२ लक्ष (१६६२ कोटी) रूपयांचा एकत्रित निव्वळ नफा (Consolidated Net Profit) प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षात कंपनीने आपल्या नफ्यातील प्रोव्हिजन मोठ्या प्रमाणात वाढवल्याने तो १०% मर्यादित राहिला आहे. मात्र आकडेवारीनुसार ही मोठी वाढ समजली जात आहे. तसेच कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या ५५८०८ लक्ष (५९७६ कोटी) तुलनेत या तिमाहीत ७५१७४० लक्ष (६६२९ कोटी) रूपयांवर मोठी वाढ नोंदवली आहे. याखेरीज कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit before tax PBT) इयर ऑन इयर बेसिसवर वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १८४७६९ लक्ष तुलनेत या तिमाहीत २२२०४५ लक्ष करपूर्व नफा मिळाला. याखेरीज कंपनीच्या एकूण खर्चातही वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ३७२०३९ लक्ष तुलनेत या तिमाहीत ५२९६९५ लक्षावर वाढ नोंदवली गेली आहे. तिमाही बेसिसवर (Quarter on Quarter QoQ) बेसिसवर कंपनीच्या नफ्यात १३७७१५ लक्षाहून तुलनेत १६६२५२ लक्षावर वाढ झाली आहे.


ऑपरेशनल कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी होती असे तज्ञांनी अधोरेखित केले आहे. ईबीटा (EBITDA) १५५८.८९ कोटीवर नोंदवला गेला आहे जो गेल्या वर्षीच्या तिमाहीत १७९६ कोटीपेक्षा कमी होता. ईबीटा (EBITDA) मार्जिन २३.५% वर गेले आहे जे गेल्या वर्षीच्या २७.४ % आणि उच्च तरतूदी आणि इतर खर्चामुळे अंदाजे २७% या दोन्हीपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आकड्यांवर गेले आहे.


खर्च व खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतांमध्ये वाढ झालेली पाहता या तिमाहीत मार्जिनमध्ये थोडीशी घट होऊ शकते असे विश्लेषकांनी यापूर्वीच अधोरेखित केले होते. कंपनीचा करोत्तर नफा (PAT) १६६९.०७ कोटी झाला आहे जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील रु. १५१०.४८ कोटी होता. ईपीएस (Earning per share EPS) मध्ये २२.५९ रुपयांवरुन २४.९६ रूपयांवर वाढ झाली आहे.


आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या सहामाहीत), एचएएल (HAL) चा निव्वळ नफा ३.५% वाढून ३०५३ कोटी झाला होता. जो इयर ऑन इयर बेसिसवर तत्पूर्वी २९४८ कोटी रूपये होता.आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या सहामाहीत कामकाजातून मिळणारा महसूल ११४४८ कोटी होता, जो आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या सहामाहीत १०३२४ कोटी होता, जो ११% वाढला होता. उत्पन्नानंतर एनएसईवर कंपनीच्या शेअर प्रति शेअर ४७४०.५० रूपयांवर व्यवहार करत होते जे उलट २.५१% कमी झाले. दुपारी ३.२८ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअरने मात्र रिकवरी केली आहे. कंपनीचा शेअर ०.१६% घसरत २४२३.५० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.


गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये स्टॉक २% वाढला असून तर गेल्या सहा महिन्यांत, कंपनीचा शेअर ७% वाढला आहे. आतापर्यंत विशेषतः या वर्षाच्या सुरुवातीपासून शेअर १४% वाढला आहे. गेल्या आठवड्यात, कंपनीने अमेरिकन संरक्षण प्रमुख GE एरोस्पेससोबत त्यांच्या तेजस हलक्या लढाऊ विमान कार्यक्रमासाठी ११३ जेट इंजिन खरेदी करण्यासाठी एक मोठा करार केला होता.


हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ही एक भारतातील प्रमुख महारत्न कंपनी आहे. भारत सरकारने केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (CPSEs) दिलेला हा 'महारत्न' दर्जा आहे. HAL ही भारतीय अवकाश आणि संरक्षण क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी आहे जी विमाने, हेलिकॉप्टर आणि संबंधित उपकरणांची रचना, उत्पादन आणि पुरवठा करण्यात भारतातील अग्रेसर कंपन्यांपैकी एक मानली जाते. सध्या कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) अंदाजे ३.४३ लाख कोटी रुपये आहे.

Comments
Add Comment

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

लंडन मधील ऐतिहासिक "इंडिया हाऊस" महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार - मंत्री आशिष शेलार

मुंबई : लंडनमधील स्वातंत्र्य सैनिकांचे वास्तव्य असलेल्या "इंडिया हाऊस"ला महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी खुशखबर! "कोणी 'माईचा लाल' आला तरी...योजनेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांना एकनाथ शिंदेंचा सडेतोड इशारा

मुंबई : राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) महिला

एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर, विराट कोहलीने बाबरला टाकले मागे

दुबई : आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे. विराट ७२५

CPI Inflation Index: ग्राहक किंमत निर्देशांकांची सरकारी आकडेवारी जाहीर ऑक्टोबर महिन्यात 'ऐतिहासिक' घसरण जाणून घ्या 'आकडेवारी'

मोहित सोमण: सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालयाने आज दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांकात (Consumer Price Index CPI)

SA20 चा भारतात जलवा! 'इंडिया डे' कार्यक्रमात चाहत्यांचा तुफान उत्साह, चौथ्या सीझनसाठी लीग सज्ज

२६ डिसेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान रंगणार SA20 चा चौथा सीझन ग्रॅमी स्मिथ, फाफ डू प्लेसिस, मिलर यांची मुंबईत