प्रतिनिधी: जीएसटी कपातीसह भरघोस खरेदी, अनुकूल वातावरण व सणासुदीच्या काळात आर्थिक वर्ष २६ मध्ये भारताचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन ७% वाढून १२.९२ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. या आर्थिक वर्षात (१ एप्रिल आणि १० नोव्हेंबर) या कालावधीत भारताचे निव्वळ प्रत्यक्ष कर (Net Direct Tax Collection) इयर ऑन इयर बेसिसवर संकलन ७% वाढून १२.९२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. मात्र दुसरीकडे रिफंडमध्ये मोठी घसरण झाल्याने आयकर विभागाने हे कर संकलन वाढल्याचे आपल्या निवेदनात नमूद केले आहे.या कालावधीत परतफेडीचे (Returns) प्रमाण १८% घसरून २.४२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. निव्वळ कॉर्पोरेट कर संकलन (Collection) ५.३७ लाख कोटी रुपयांवर गेले असून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये याच कालावधीत हे संकलन ५.०८ लाख कोटी रुपये होते.
माहितीनुसार, व्यक्ती आणि एचयूएफसह (Hindu Undivided Family), तसेच बिगर-कॉर्पोरेट कर या श्रेणीतील कर या आर्थिक वर्षात आतापर्यंत सुमारे ७.१९ लाख कोटी रुपयांवर गेल्याचे सरकारी विभागाकडून स्पष्ट केले गेले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत (तिमाहीत) सुमारे ६.६२ लाख कोटी रुपये होते.
या आर्थिक वर्षात आतापर्यंत सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) संकलन ३५६८२ कोटी रुपये झाले आहे मागील वर्षी हे संकलन ३५९२३ कोटी रुपयांपेक्षा किंचित कमी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
व्यक्तिगत उत्पन्न कर आणि कॉर्पोरेट कर यांचा समावेश असलेल्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात या आर्थिक वर्षात १० नोव्हेंबरपर्यंत वार्षिक ७% वाढ होऊन १२.९२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या सुमारे १२.०८ लाख कोटी रुपये होती. परतफेड समायोजित (Adjusted Returs ) करण्यापूर्वी एकूण प्रत्यक्ष कर संकलन या आर्थिक वर्षात आतापर्यंत १५.३५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे, जे मागील वर्षीच्या तुलनेत २.१५% वाढले.
एकूण बिगर-कॉर्पोरेट कर (वैयक्तिक उत्पन्न करासह) या कालावधीत ०.५% वाढून ८.१ लाख कोटी झाले असल्याचे आकडेवारीत म्हटले आहे. उपलब्ध माहितीनुसार, ही परताव्यातील घट झाल्यामुळे प्रामुख्याने ११ नोव्हेंबरपर्यंत या आर्थिक वर्षात निव्वळ संकलन ७% वाढून १२.९ लाख कोटी झाले. या कालावधीत निव्वळ कॉर्पोरेट कर संकलन ५.७% वाढले आणि निव्वळ बिगर-कॉर्पोरेट कर संकलन ८.७% वाढले आहे.