'ऊत' चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रकाशित

जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २१ नोव्हेंबरला चित्रपटगृहात


समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. अशाच एका जिद्दी युवकाच्या संघर्षाचा वेध घेणाऱ्या 'ऊत' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित 'ऊत' चित्रपटात संघर्ष कथेसोबतच एक प्रेमकथाही पहायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा विश्वास निर्माता अभिनेता राज मिसाळ यांनी यावेळी व्यक्त केला.


एका हळव्या प्रेमकथेची किनार दाखवताना चित्रपटाचा नायक शरणम याचा भुतकाळ, त्याचा संघर्षाचा काळ, त्यांनी पचवलेले दु:ख व त्यानंतरही उभे राहण्याची जिद्द आपल्यासमोर येणार आहे. कथेचा नायक शरणम... कर्तव्य आणि प्रेम यांचा समन्वय साधू पाहतोय. स्वप्न पहायला पैसे लागत नाहीत आणि स्वप्न पूर्ण करायला पण पैसे लागत नाहीत लागते ती फक्त मेहनत आणि जिद्द. शरणमने हाती घेतलेलं असाध्य ध्येय पूर्ण होतं का? असंख्य अडचणींवर मात करताना त्याला त्याच्या प्रेमाची समंजस साथ लाभते का? या आणि अशा अनेक उत्कंठावर्धक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी २१ नोव्हेंबरला येणारा ‘ऊत’ पहायलाच हवा.


राज मिसाळ, आर्या सावे या नव्या जोडीसोबत सुपर्णा श्याम राजकुमार तांगडे, अनिकेत केळकर, प्राजक्ता केळकर, पुरषोत्तम वाघ, शैलेश कोरडे, अर्चना रावल, दीपक पाटील, वैदही ठाकूर, सिद्धेश्वर थोरात, अभय कुलकर्णी, श्रेया देशमुख, धनश्री साटम, रूपाली पाथरे आदि कलाकारांच्या सुद्धा चित्रपटात भूमिका आहेत.


'ऊत' चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी करण तांदळे तर संकलनाची जबाबदारी सुनिल जाधव यांनी सांभाळली आहे. वेशभूषा वैशाली काळे तर रंगभूषा अमर राठोड यांची आहे. कलादिग्दर्शन निलेश गरुड तर नृत्यदिग्दर्शन जीत सिंह यांचे यांचे आहे. वैभव देशमुख, वैभव जोशी, डॉ.विनायक पवार, सुबोध पवार, दिपक वाघ यांनी लिहिलेल्या गीतांना अजय गोगावले, हरिहरन, आदर्श शिंदे, जयदीप वैद्य, योगेश गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. विजय गवंडे, श्रेयस आंगणे, आशोतोष कुलकर्णी, अरविंद सांगोळे, शारंग जैसवाल यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे.

Comments
Add Comment

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत