Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या सुरक्षेत वाढ; सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पुणे : भारताची राजधानी दिल्लीमध्ये (New Delhi)  सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमुळे (Bomb Blasts) संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या भीषण घटनेत आतापर्यंत ९ लोकांचा मृत्यू झाला असून, सुमारे २४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये तातडीने उपचार सुरू आहेत. दिल्लीत झालेल्या या स्फोटानंतर मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क (Alert Mode) झाल्या आहेत. याचाच भाग म्हणून पुणे शहरातही सुरक्षा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुण्यातील सर्वात संवेदनशील आणि गर्दीचे ठिकाण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. मंदिर परिसरात आणि आजूबाजूला कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिरासह शहराच्या इतर संवेदनशील भागांमध्येही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. विशेषतः, सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन परिसराची देखील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून पाहणी सुरू आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, प्रमुख सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



शिर्डी पोलिसांकडून प्रवेशद्वारावर वाहनांची कसून तपासणी


बॉम्बस्फोटांच्या (Bomb Blasts) भयानक घटनेनंतर देशभरातील प्रमुख धार्मिक आणि सार्वजनिक स्थळांच्या सुरक्षेबाबत अत्यंत कडक खबरदारी घेतली जात आहे. याचाच भाग म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या साईबाबांच्या शिर्डीतही सुरक्षा यंत्रणा 'अलर्ट मोड'वर आल्या आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिर्डी पोलिसांकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शिर्डीच्या सर्व प्रवेशद्वारांवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिर्डीत दाखल होणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता, सतर्क राहावे आणि कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्तीबद्दल पोलिसांना तातडीने माहिती द्यावी, अशा सूचनाही पोलिसांनी दिल्या आहेत. शिर्डीच्या या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रात भाविकांची सुरक्षितता जपण्यासाठी पोलीस प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे.

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास