Gautami Patil : नृत्य नाही, आता शौर्य! गौतमी पाटीलचं 'नऊवारी' गाणं रेकॉर्ड ब्रेक, चाहत्यांकडून तुफान लाईक्स

मुंबई : आपल्या दमदार नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, त्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 'सानिधप ओरिजनल्स' प्रस्तुत गौतमी पाटीलचं हे गाणं 'नऊवारी' या नावाने प्रदर्शित झाले आहे. गौतमीच्या या नव्या गाण्याला एक उत्कृष्ट तांत्रिक टीम लाभली आहे. या गाण्याची निर्मिती डॉ. विवेक इंगळे यांनी केली आहे. गाण्याला सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका बेला शेंडे यांच्या मधुर आवाजाची सुंदर साथ लाभली आहे. पंकज वारूंगसे यांनी या गाण्याची गीतरचना आणि संगीत केले आहे. तसेच, मनीष शिंदे यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. गौतमी पाटीलच्या दमदार नृत्यामुळे आणि बेला शेंडे यांच्या आवाजामुळे हे गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 'नऊवारी' गाण्यामुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे.



'नऊवारी' गाण्यामागे लढवय्या स्त्रियांची कथा.


गाण्याच्या चित्रीकरणाविषयी बोलताना दिग्दर्शक मनीष शिंदे म्हणाले, "हे गाणं पहिल्यांदा मी ऐकलं, तेव्हा नुसती लावणी न सादर करता आपण त्यामागे एखादी कथा सांगावी, असा मी विचार केला." मनीष शिंदे यांनी 'नऊवारी'चा अर्थ स्पष्ट केला की, "नऊवारी साडी म्हणजे आपली परंपरा आहे. राजा महाराजांच्या काळापासून स्त्रिया नऊवारी साडी परिधान करत आल्या आहेत. त्या काळात ज्या 'लढवय्या स्त्रिया' होत्या, त्या नऊवारी साडी परिधान करायच्या, जेणेकरून त्यांना घोडेस्वारी करणं किंवा डोंगरकडा सर करणं सोपं जायचं. त्यामुळे मी ठरवलं की ही लावणी नसून एक योजना आहे, असं गाणं चित्रीत करू." या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी टीमने प्रचंड मेहनत घेतली. दोन दिवस गाण्याच्या आर्ट डिरेक्शनचं (Art Direction) काम झाले. त्यानंतर पुण्यातील विठ्ठल वाडी आणि मुळशी गावातील घनदाट जंगलात या गाण्याचा सुरुवातीचा भाग चित्रीत करण्यात आला. गाण्याच्या संपूर्ण टीमने सर्व लाइट्स, कॅमेरा आणि इतर सामान त्या लोकेशनपर्यंत पोहोचवले. यामागे सर्व कलाकार आणि टीमने घेतलेली प्रचंड मेहनत आहे. 'नऊवारी' गाण्याचे निर्माते डॉ. विवेक इंगळे यांनी या गाण्याच्या निर्मिती प्रक्रियेविषयी बोलताना आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले, "नऊवारी या गाण्याची निर्मिती करताना माझा अनुभव अतिशय भावनिक होता."



'नऊवारी' गाणं नुसतं लावणी नाही, तर 'शिवकालीन गुप्तचर योजना'


गाण्याच्या निर्मितीचा अनुभव सांगताना निर्माते म्हणाले, "सर्वात पहिले जेव्हा गीतकार-संगीतकार पंकज वारूंगसे यांनी मला हे गाणं ऐकवलं, तेव्हा त्या शब्दांचा अर्थ, त्यामागची भावना आणि त्यातली ताकद माझ्या मनाला थेट भिडली. त्याच क्षणी मला जाणवलं की हे गाणं फक्त बनवायचं नाही, तर ते जगासमोर पोहोचवायचं आहे." गाण्याची धून तयार झाल्यावर गायिका म्हणून सर्वप्रथम बेला शेंडे यांचे नाव निश्चित झाले. निर्मात्यांनी गाणं ऐकवताच, बेला शेंडे यांनी ते तितक्याच प्रेमाने स्वीकारलं आणि त्यानंतर गाण्याचं रेकॉर्डिंग अतिशय सुंदर पद्धतीने पार पडले. या गाण्याला खरी वेगळी ओळख मिळाली ती दिग्दर्शक मनीष शिंदे यांच्या संकल्पनेमुळे. निर्माते सांगतात, "मनीष यांनी हे गाणं ऐकून सांगितलं की नऊवारी फक्त एक लावणी नसून, शिवकालीन गुप्तचर संघटनेची एक सखोल योजना म्हणूनही ती मांडता येते." मनीष शिंदे यांनी ही खास दृष्टी प्रत्यक्ष पडद्यावर जिवंत केली. याशिवाय, के. विजय यांनी अप्रतिम छायाचित्रण (Cinematography) केले आहे, तर नृत्य दिग्दर्शन अविनाश नलावडे यांनी ताकदीने साकारले आहे. सेटवरील सर्व कलाकार आणि तांत्रिक कार्यसंघाने हे 'नऊवारी' केवळ एक गाणं नाही, तर एक अनुभव आहे, हे मनापासून जाणवलं. आज त्याच भावनेचा अनुभव प्रेक्षकही घेत आहेत आणि या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Comments
Add Comment

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या