Delhi Blast : लाल किल्ला स्फोट : ४ डॉक्टरांचे दहशतवादी कनेक्शन उघड; शिक्षण क्षेत्राचा वापर 'काळ्या कारनाम्यांसाठी'

फरीदाबाद : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ रविवारी सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी झालेल्या भीषण कार स्फोटाने (Car Blast) राजधानी हादरली आहे. या स्फोटात ९ लोकांचा मृत्यू झाला असून २० लोक जखमी झाले आहेत. स्फोट झालेली हुंडाई i२० कार घटनेपूर्वी सुमारे ३ तास सुनहरी मशिदीजवळ पार्क होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेलला हा हल्ला फिदायीन (आत्मघाती) दहशतवादी हल्ला असल्याचा प्रबळ संशय आहे. या संपूर्ण कटात शिक्षित आणि प्रतिष्ठित डॉक्टर सहभागी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.



तीन तास पार्क केलेली कार आणि स्फोट


ज्या हुंडई i२० कारमध्ये स्फोट झाला, ती कार सूनहरी मशिदीजवळ घटनेच्या तीन तास आधीपासून पार्क केलेली होती. स्फोटानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तपास सुरू केला असता काही धक्कादायक पुरावे हाती आले. या पुराव्यांमुळे तपासकऱ्यांना जाणवले की हल्ल्यामागे एक प्रशिक्षित आणि संघटित नेटवर्क कार्यरत आहे आणि त्यात ‘डॉक्टर कनेक्शन’ समोर आलं आहे.



स्फोटाच्या घटनाक्रमातील 'डॉक्टर कनेक्शन'


या घटनेच्या काही दिवस आधी जम्मू-कश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुमारे २,९०० किलो आयईडी बनवण्याचे केमिकल, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला होता. ही कारवाई ‘जैश-ए-मोहम्मद (JeM)’ आणि ‘अंसर गजवात-उल-हिंद (AGuH)’ या दहशतवादी संघटनांशी संबंधित नेटवर्कवर करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर दिल्ली स्फोट आणि या जप्तीमधला संबंध शोधताना पोलिसांना काही डॉक्टरांकडे पोहोचता आले आहे.


१. डॉ. आदिल अहमद राठर- लॉकरमध्ये AK-४७


जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर डॉ. आदिल अहमद राठर याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या लॉकरमधून AK-४७ रायफल सापडली. तपासात तो जैश आणि अंसर गजवात-उल-हिंद या संघटनांशी थेट संपर्कात असल्याचे उघड झाले.


२. महिला डॉक्टर शाहीन शाहिद- कारमध्ये असॉल्ट रायफल


दुसरी अटक फरीदाबादमध्ये झाली. लखनऊची महिला डॉक्टर शाहीन शाहिद, जी अल-फलाह विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होती, तिच्या कारमधून ‘कॅरोम कॉक’ असॉल्ट रायफल जप्त करण्यात आली. तिची भूमिका नेमकी काय होती, हे शोधण्यासाठी तपास सुरू आहे.


३. डॉ. अहमद मोहियुद्दीन सैयद- ‘रिसिन’ विष तयार करताना पकडला


गुजरात ATS ने ७ नोव्हेंबर रोजी डॉ. अहमद मोहियुद्दीन सैयद नावाच्या डॉक्टरला अटक केली. तो हैदराबादचा असून चीनमध्ये शिक्षण घेतलेला आहे. तो ‘रिसिन’ नावाचे अत्यंत प्राणघातक विष तयार करत होता, जे अरंडीच्या बियांपासून बनते. त्याने दिल्लीतील आजादपूर मंडी, अहमदाबादमधील नरोडा मार्केट आणि लखनऊ येथील RSS कार्यालय यांसारख्या गर्दीच्या ठिकाणांची रेकी केल्याचे आढळले.


४. डॉ. मुझमिल शकील- २,९०० किलो स्फोटकांसह अटक


१० नोव्हेंबरला फरीदाबादमध्ये आणखी एक अटक झाली- डॉ. मुझमिल शकील. तो देखील काश्मीरचा असून अल-फलाह विद्यापीठात प्राध्यापक आहे. त्याच्याकडे ३६० किलो अमोनियम नायट्रेट सापडले, तर दुसऱ्या ठिकाणाहून २५६३ किलो स्फोटक द्रव्य जप्त करण्यात आले. तो जैशसारख्या संघटनांशी थेट संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे.



ब्लास्ट झालेली i२० कार डॉक्टर उमर मोहम्मदच्या नावावर


ज्या i२० कारमध्ये स्फोट झाला ती दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथील डॉ. उमर मोहम्मद यांच्या नावावर नोंदणीकृत होती. तपासात तो स्फोटाच्या वेळी कारमध्ये असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



शिक्षित वर्गात पसरतोय दहशतवादाचा विष


या सर्व अटकांमुळे तपास यंत्रणांच्या नजरेत एक गंभीर बाब आली आहे आणि ती म्हणजे दहशतवाद आता शिक्षित आणि प्रतिष्ठित वर्गातही मुळे घट्ट करत आहे. पांढऱ्या कोटात दिसणारे हे डॉक्टर देशविघातक कटात सहभागी असल्याने ही घटना धक्कादायक ठरली आहे. पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा आता या नेटवर्कचा आंतरराज्यीय स्तरावर तपास करत आहेत, तर दुसरीकडे या “डॉक्टर ते दहशतवादी” कथेनं देशभरात चिंता निर्माण केली आहे.

Comments
Add Comment

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

DRDO Military Combat Parachute System test : लडाखमध्ये २२,००० फूट उंचीवरून स्वदेशी लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने लडाखमधील जगातील सर्वात उंच ड्रॉप झोनपैकी एकावर आपल्या लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक