मोहित सोमण:आज जागतिक बाजारपेठेतील दबाव शेअर बाजारात असल्याचे गिफ्ट निफ्टीतील सुरूवातीच्या कलात स्पष्ट झाले होते. मात्र आठवड्याची सुरूवात शेअर बाजारात तेजीने झाली आहे. सेन्सेक्स २५०.९९ व निफ्टी ७८.९० अंकांने वधारला आहे. दोन्ही बँक निर्देशांकात पुरेशी वाढ झाल्याने निर्देशांकात तेजीकडे गुंतवणूकदारांचा कल असल्याचे स्पष्ट झाले. मात्र अमेरिकेतील 'करेक्टिव' उपायांमुळे आज शेअर बाजारात तेजीचा खतपाणी मिळाले असून शुक्रवारी जागतिक ए आय शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा फटका वैश्विक शेअर बाजारात बसला होता तर भारतात मोठे सेल ऑफ झाले होते. आज मात्र युएसमधील सिनेटने युएस शटडाऊन विषयक मोठी पावले उचलल्याने त्याचा जागतिक परिणाम आशियाई बाजारासह सकाळच्या सत्रात दिसत आहे. दुसरीकडे स्मॉलकॅपसह काही ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही किरकोळ घसरण झाल्याने बाजारातील सकाळची रॅली मर्यादित राहिली आहे.
सकाळच्या सत्रात व्यापक निर्देशांकात निफ्टी नेक्स्ट ५० (०.७४%), बँक (०.२४%), निफ्टी १०० (०.३९%), मिड कॅप १०० (०.५०%), लार्जकॅप २५० (०.४२%) निर्देशांकात वाढ झाली असून केवळ मिडिया (०.१०%) वगळता इतर क्षेत्रीय निर्देशांकात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ आयटी (०.५१%), आयटी (०.५१%), रिअल्टी (०.५६%), फार्मा (०.७४%), मेटल (०.७७%) निर्देशांकात झाली आहे. आज सकाळच्या सत्रात टाटा मोटर्स (१.०१%), रिलायन्स इंडस्ट्रीज (१.०६%), एचडीएफसी (०.२२%), इन्फोसिस (१.१४%) शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर बजाज हाउसिंग (०.६५%), न्यूजेन सॉफ्टवेअर (०.५४%),बजाज फायनान्स (०.१९%), टाटा कंज्यूमर (०.०८%) या बड्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
शेअर बाजारातील मिश्र तिमाहीतील निकालांच्या आधारावर आज बाजारात श्रेत्रीय विशेष निर्देशांकात परिणाम होण्याची शक्यता असून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भूमिका आजही महत्वाची ठरेल. मात्र आजही विशेषतः अस्थिरता निर्देशांकाचा प्रभावी परिणाम आज अखेरच्या सत्रात राहू शकतो कारण भारत युएस यांच्यातील करारावर तोडगा अद्याप निघालेला नाही. त्यामुळे अस्थिरतेवर आजची शेअर बाजारातील गणिते अवलंबून असतील. तज्ञांच्या मते, जागतिक संकेत आणि परदेशी निधी प्रवाहाचा मागोवा घेऊन अस्थिर सत्राची अपेक्षा विश्लेषकांना आहे. शट डाऊन संदर्भात अमेरिकन सिनेटच्या करारामुळे दिलासा मिळेल तर धोरणात्मक दिशानिर्देशासाठी देशांतर्गत लक्ष सीपीआय (Consumer Price Index CPI) आणि डब्ल्यूपीआय (Wholesale Price Index) महागाई डेटावर केंद्रित केले जाईल. माहितीनुसार, एफआयआय (परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार) निव्वळ विक्रेते बनले आहेत नोव्हेंबरमध्ये १३३६७ कोटींची विक्री केली आहे ज्यामुळे २०२५ चे एकूण जावक (Outflow( २ लाख कोटींपेक्षा जास्त झाला आहे. तांत्रिकदृष्ट्या, निफ्टीला २६००० पातळीच्या जवळ जोरदार प्रतिकाराचा सामना करावा लागत आहे.
युएस बाजारातील कालच्या अखेरच्या सत्रात नासडाक (०.२१%) वगळता डाऊ जोन्स (०.२३%), एस अँड पी ५०० (०.१३%) बाजारात वाढ झाली आहे. आशियाई बाजारातील सुरूवातीच्या सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ गिफ्ट निफ्टीसह (०.३५%) निकेयी २२५ (०.९५%), हेंगसेंग (०.६६%), कोसपी (२.९५%) निर्देशांकात झाली आहे.
सुरूवातीच्या कलात शेअर बाजारात सर्वाधिक वाढ एचबीएल इंजिनिअरिंग (१२.१६%), रिलायन्स पॉवर (५.९५%), बलरामपूर चिनी (५.०१%), न्यूलँड लॅब्स (४.६१%), बजाज होल्डिंग्स (४.४१%), एफ एस एन ई कॉमर्स (३.८०%), जेपी पॉवर वेंचर (३.४१%) निर्देशांकात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण टीआरआयएल (१९.९९%), शिंडलर इलेक्ट्रॉनिक्स (७.०८%), एससीआय (६.६१%), एथर एनर्जी (४.६६%), नावा (४.८५%), ग्लोबल हेल्थ (४.०४%), सिग्नेचर ग्लोबल (२.१६%), हेक्सावेअर टेक्नॉलॉजी (२.०४%), लीला पॅलेस हॉटेल (२.०३%) समभागात झाली आहे.