तानसा अभयारण्यासह परिसरात २३ प्रकारच्या पक्ष्यांचे दर्शन

शहापूर : अडई, हरिद्र, कोतवाल, शिंपी, वेडा राघू, नदीसुरय, तिसा अशा एक ना अनेक रंगबिरंगी विहंगांचा मुक्त विहार शहापूरच्या तानसा अभयारण्यासह वन्य परिसरात सुरू असल्याची नोंद झाली आहे. वन्यजीव संरक्षणकर्ते पद्मश्री मारुती चितमपल्ली आणि भारताचे पक्षी मानव पद्मभूषण डॉ. सालिम अली यांच्या जयंतीनिमित्त राज्यात ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने वेहळोलीच्या पाझर तलाव येथे पहिल्याच दिवशी केलेल्या पक्षी निरीक्षणात तब्बल २३ प्रकारच्या नयनरम्य पक्ष्यांचे विलोभनीय दृश्य पक्षी निरीक्षकांच्या दृष्टीपथात आले. या सप्ताहात ९० ते शंभर पक्षी दृष्टीपथात येण्याची शक्यता पक्षी निरीक्षकांनी वर्तवली आहे.


शहापूर तालुक्यातील तानसा अभ्यारण्यासह वनविभागाच्या डोळखांब, जांभे, भातसा, तानसा, मोडकसागर आदि परिसरात पक्षी निरीक्षण करण्यात येणार आहे. तानसा वन्यजीव विभाग, शहापूर वनविभाग आणि आउल कंझर्वेशन फाउंडेशन यांच्या माध्यमातून पक्षीमित्र व वन्यजीव अभ्यासक रोहिदास डगळे, भूषण विशे, सागर वेहळे, प्रशांत शिराळ, भार्गव लाड, योगेश शिद, अक्षय गहरे या शहापूर तालुक्यातील पक्षीमित्रांनी यांनी खातीवली - वेहळोलीच्या पाझर तलाव जवळ तळ ठोकून पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली. याठिकाणी विशेष हिवाळी पाहुणे नदीसुरय, राखी धोबी, दलदली ससाणा दिसून आले तर सामान्य पणे आपल्या भागात आढळणारे बगळे, पाणकावळा, राखी पाकोळी, अडई, हरिद्र, कोतवाल, शिंपी, वेडा राघू, शिक्रा, कोतवाल, हळद्या, तिसा अशा विविध २३ पक्षी प्रजातींचा मुक्त विहार आढळून आला आहे. या विविध रंगीबेरंगी विहंगांमुळे तानसा अभयरण्यासह वनविभागाचा परिसर बहरून निघाला आहे.

Comments
Add Comment

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी  एकूण ७,१७,१०७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, एकूण ५२.११% मतदान !

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी दि.15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ९,१७,१२३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; एकूण ५५.५९ टक्के टक्के मतदान

ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या प्राप्त

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे

कल्याण-डोंबिवलीत ४०.०७ टक्के मतदान

मतदानाचा टक्का घसरला; दुपारी वेग वाढला कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेत

ठाण्यात सुमारे ५५ टक्के मतदान

मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३०

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने