Kapston Q2FY26 Results : कॅपस्टोन सर्विसेस लिमिटेडचा तिमाही निकाल जाहीर! कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात ७९.६४% वाढ

मोहित सोमण:कॅपस्टोन सर्विसेस लिमिटेड (Kapston Services Limited) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या इयर ऑन इयर बेसिसवर इयर ऑन इयर बेसिसवर एकत्रित करोत्तर नफ्यात (Consolidated Net Profit) ७९.६४% वाढ झाल्याचे आर्थिक निकालात स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ३.९३ कोटी तुलनेत या तिमाहीत कंपनीला ७.९६ कोटी रुपये मिळाला आहे. ईबीटात (EBITDA) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तुलनेतील ७.४९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १०.५७ कोटींवर वाढ प्राप्त झाली आहे त्यामुळे ही वाढ ४१.१२% झाल्याचे कंपनीने आपल्या निकालपत्रात स्पष्ट केले. याशिवाय कंपनीच्या एकूण महसूलात (Total Revenue) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १६८.३४ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत २११.२७ कोटींवर वाढ झाली आहे जी २५.५०% इयर ऑन इयर बेसिसवर आहे.


कंपनीच्या निकालावर भाष्य करताना कंपनीचे कार्यकारी संचालक श्रीकांत कोडाली म्हणाले आहेत की,'आमचा मजबूत ऑपरेशनल पाया आणि ग्राहक-केंद्रित अंमलबजावणी दर्शविणारा आणखी एक तिमाही स्थिर कामगिरी सामायिक करताना आम्हाला आनंद होत आहे. आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या आणि पहिल्या तिमाहीत, कंपनीने नवीन क्लायंट अधिग्रहण आणि विद्यमान ग्राहकांशी सखोल संबंधांद्वारे उद्योगांमध्ये निरोगी वाढ करणे सुरू ठेवले.ऑपरेशनल उत्कृष्टता, तंत्रज्ञान विकास आणि कर्मचारी प्रशिक्षण यावर आमचे लक्ष केंद्रित केल्याने आम्हाला सेवा गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढविण्यास सक्षम केले आहे. या शिस्तबद्ध दृष्टिकोनामुळे मनुष्यबळ समाधानासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून आमची स्थिती मजबूत होत आहे. आमच्या कर्मचाऱ्यांवर, क्लायंटवर आणि इतर भागधारकांवर त्यांचा सतत विश्वास आणि आमच्या प्रवासात योगदान दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.'


कॅप्स्टन ही एक वेगाने वाढत असलेल्या एंड-टू-एंड मनुष्यबळ सोलूशन कंपनीपैकी एक आहे. २००९ मध्ये स्थापन झालेली कंपनी ७०० हून अधिक ग्राहकांना सेवा देत आहे तसेच ३०००० हून अधिक सहकारी कर्मचारी कंपनीने नियुक्त केले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, तज्ज्ञता विविध उद्योगांमध्ये पसरलेली आहे विशेषतः आयटी आणि आयटीईएस, बहुराष्ट्रीय कंपन्या, कॉर्पोरेशन, बीएफएसआय, आरोग्यसेवा, आतिथ्य, किरकोळ विक्री, फार्मा, एफएमसीजी, पायाभूत सुविधा, बांधकाम, निवासी स्थळे आणि त्यापलीकडे एक विश्वासार्ह 'वन-स्टॉप सोल्यूशन प्रदाता' असल्याचे कंपनीने अधोरेखित केले होते.

Comments
Add Comment

खासदारकीसाठी संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतील - नवनाथ बन

- औरंगजेब फॅन क्लब चालवणा-या संजय राऊतांना हिंदुत्वाच्या बाता मारत भाजपावर टीका करण्याचा अधिकार

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

भारताच्या मदतीला धावून आली अर्जेंटिना; २० हजार किमी दूरून अर्जेंटिना भारताला एलपीजी पुरवणार

पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे आणि होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्याने भारतात

जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील