इच्छुकांच्या ह्दयात धडधड आणि पोटात भीतीचा गोळा; माजी नगरसेवकांसह सर्वांचे देवाला साकडे

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरता २२७ प्रभागांची आरक्षण लॉटरी सोडत


मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सन २०२५च्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण सोडत येत्या मंगळवारी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी काढण्यात येणार असून ही लॉटरी सोडत यापूर्वीच्या निवडणुकांमधील आरक्षणाच्या चक्राकार पध्दतीने न काढता नव्याने काढण्यात येणार आहे. त्यामुळे माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांना आता अनुमान लावता येणार नाही. यावेळेस सर्व प्रभाग आरक्षणे ही नव्याने निघणार असल्याने प्रत्येक पक्षाच्या माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांच्या उरात धडधड आणि पोटात गोळा उठलेला आहे. त्यामुळेच सर्वच उमेदवारांनी आता आपल्याला पुरक आरक्षण पडावे यासाठी देवाचा धावा सुरु केल्याचे दिसून येत आहे.


मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांचे आरक्षण सोडत कार्यक्रम मंगळवारी सकाळी ११ अकरा वाजता वांद्रे (पश्चिम) येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडेल. मुंबई महानगरपालिकेचे यूट्यूब (@MyBMCMyMumbai) आणि हॅथवे केबल वाहिनी क्रमांक-२६ वरुन या सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे..


मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी ही सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत पूर्णपणे नव्याने निघणार असल्याने महापालिकेच्या माजी नगरसेवक तसेच विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार यांचे या पूर्वीचे अनुमान चुकले जाणार आहे. त्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रभागा जवळपास निश्चित मानले जात असले तरी इतर मागासवर्ग आणि खुला प्रवर्ग महिला आणि पुरुष प्रभाग कुठले असतील याबाबत प्रत्येकाचे नशीब चिठीवरच ठरणार आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या लॉटरी सोडतीच्या चिंतेने अनेकांच्या ह्दयातील धडधड आता वाढू लागली आहे, तर अनेकांच्या पोटातच भीतीचा गोळा आलेला आहे. विद्यमान प्रभाग पुन्हा कायम राखला जावा किंवा आपल्या जाती प्रवर्गानुसार आरक्षण पडावे असो साकडे प्रत्येक जण आपल्या देवाला घालताना दिसत आहे..


या आरक्षण सोडतीत कुणाला देव पावतो आणि कुणावर देव अवकृपा करतो हे पाहायला मिळणार असून ज्यांचे प्रभाग मनाप्रमाणे आरक्षित झाल्यास ते चेहऱ्यावर हासू असेल आणि ज्यांचे वॉर्ड जाणार ते निश्चितच नाराज असतील, त्यामुळे आरक्षणाचा फटका कुणाला बसतो आणि कुणाला फायदा ठरतो याकडे सर्वाचे भवितव्य या लॉटरी सोडतीत दिसून येणार आहे.



कशी आरक्षण सोडत प्रक्रिया


प्रथम अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे उतरत्या क्रमाने लोकसंख्येनेुसार प्रभाग जाहीर करून महिला आणि पुरुषांचे प्रभाग जाहीर केले जातील.


उर्वरीत २१० प्रभागांमधून मागासवर्ग प्रवर्गासाठी ५१ चिठ्या काढल्या जातील., या ६१मधून प्रथम महिलां आरक्षित ३१ प्रभागांच्या चिठ्या काढून उर्वरीत ३० पुरुषांचे प्रभाग जाहीर केले जातील.


त्यानंतर उर्वरीत १४९ प्रभागांमधून प्रथम ७४ प्रभागांमधून महिला आरक्षित प्रवर्गाासाठी चिठ्या काढून उर्वरीत ७५ चिठ्या खुला प्रवर्गासाठी जाहीर केल्या जातील.



कसे असेल आरक्षण


अनुसूचित जातीचे राखीव प्रवर्ग : १५


महिला प्रभाग : ०८, पुरुष प्रभाग ०७


अनुसूचित जमाती राखीव प्रवर्ग : ०२


महिला प्रभाग : ०१, पुरुष प्रभाग ०१


नागरिकांचा मागासवर्ग राखीव प्रवर्ग : ६१


महिला प्रभाग : ३१, पुरुष प्रभाग ३०


सर्वसाधारण राखीव प्रवर्ग १४९


महिला प्रभाग ७४, पुरुष प्रभाग ७५



या प्रभागांमध्ये दावेदारी आली संपुष्टात


सन २०१९ आणि सन २०२४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सपाचे रईस शेख., रमेश कोरगावकर, बाळा नर आदी आमदार झाले असून त्यातील रमेश कोरगावकर यांना सन २०२४च्या निवडणुकीत पराभूत झाल्याने, आमदार झालेल्या दोन प्रभाग रिक्त झाले आहेत. तर भाजपाचे राम बारोट, विश्वनाथ महाडेश्वर आणि उबाठाच्या शाहीन यांचे निधन झाल्याने हे तिन्ही प्रभाग रिक्त झाल्याने याठिकाणी नवीन उमेदवारांची वर्णी लागली जाणार आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'बाहेर कडेकोट बंदोबस्त!

'मातोश्री'वर ड्रोन दिसल्यानंतर पोलिसांची खबरदारी मुंबई: शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या

दिल्ली हादरताच मुंबईत 'हाय अलर्ट'! रात्रीची गस्त वाढवली; रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि बाजारात कडक बंदोबस्त

 लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर आठ ठार; सुरक्षा यंत्रणा सतर्क मुंबई : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ

महानगरपालिकेच्‍या अतिधोकादायक न्‍यू माहीम शाळेचा पुनर्विकास, पुन्हा त्याच ठिकाणी बांधणार शाळा

मुंबई (खास प्रतिनिधी) : न्‍यू माहीम महानगरपालिका  मराठी माध्यमाची शालेय इमारत धोकादायक दाखवून ती पाडली जाते. या

मुख्यमंत्र्यांच्या घरातील किचन क्विन कोण? सकाळच्या नाश्त्याला काय आहार करतात अमृता फडणवीस?

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा नेहमी

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

मंगळवारपासून डॉक्टरांचा आमरण उपोषणाचा इशारा

मुंबई :  मुंबईतील रुग्णालये आणि खासगी दवाखान्यांमधून निर्माण होणारा जैवरासायनिक कचरा संकलनाचे काम राज्य