मोहित सोमण:आज जागतिक घडामोडींमुळे अस्थिरतेतील आशेचा किरण, युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीवरील आश्वासकता व युएस शटडाऊन बंद होण्याच्या मार्गावरील घटनांमुळे आज सोन्याच्या दरात सकाळपासूनच 'जबरदस्त' वाढ झाली आहे. अनिश्चिततेत सोन्याला सुरक्षित गुंतवणूक समजली जाते त्यामुळे भौतिक सोन्यासह डिजिटल गोल्ड ईटीएफ गुंतवणूकीत रेकॉर्डब्रेक वाढ सुरू झाल्याने सोन्याला मोठी मागणी निर्माण झाली व पर्यायाने सोन्यात मोठी दरवाढ झाली आहे हीच परिस्थिती चांदीतही कायम राहत वाढत्या ईटीएफ मागणीसह जागतिक स्पॉट फ्युचर निर्देशांकावर दबाव निर्माण झाल्याने चांदीतही आज वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याने जोरदार वापसी केली आहे. 'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात थेट १२० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११० रुपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२३२२ रूपये, २२ कॅरेटसाठी ११२९५ रूपये, १८ कॅरेटसाठी ९२४२ रूपयांवर पोहोचले आहेत.
माहितीनुसार, २४ कॅरेट प्रति तोळा किंमतीत १२०० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ११०० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ९०० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२३२२० रूपये, २२ कॅरेटसाठी ११२९५० रूपये, १८ कॅरेटसाठी ९२४२० रूपयांवर पोहोचला आहे. तसेच मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर आज २४ कॅरेटसाठी १२४४८ रूपये, २२ कॅरेटसाठी ११२९५ रूपये, १८ कॅरेटसाठी ९२४२ रूपयांवर पोहोचले आहेत.
भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.७३% वाढ झाली असल्याने दरपातळी १२३१५६ रूपयांवर पोहोचली आहे. तसेच जागतिक पातळीवरील विचार केल्यास, युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत थेट १.९२% वाढ झाली आहे. तर गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत १.९७% वाढ झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ४०७८.६३ रूपये औंसवर गेली आहे.
तसेच अमेरिकेतील कामगार बाजाराच्या सकारात्मक आकडेवारीमुळे फेडरल रिझर्व्हकडून लवकरच दर कपात होण्याची अपेक्षा बळावली आहे. तसेच कंपन्यांनी ग्राहकांच्या मागणीत घट झाल्याचे कारण सांगून युएसमधील चॅलेंजरमध्ये नोकरी कपातीत तिप्पट वाढ झाली जी गेल्या दोन दशकांमधील सर्वात मोठी मासिक वाढ आहे. मजबूत एडीपी वेतनवाढ आणि कामगार परिस्थितीवरील अनिश्चितता यामुळे बाजाराला डिसेंबरमध्ये दर कपातीची शक्यता ६९% ने वाढली असे तज्ञांचे मत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कमकुवत अमेरिकन डॉलरने परदेशी गुंतवणूकदारांसाठी सोन्याचे आकर्षण वाढवून सोन्याला आणखी आधारपातळी दिली होती तर अमेरिकन सरकारच्या शटडाऊनमुळे सुरू असलेल्या अनिश्चिततेमुळे सुरक्षित-निवासस्थानाची आणखी मागणी वाढली आहे. त्यामुळे सोन्याने आज वापसी केली दरम्यान, पीपल्स बँक ऑफ चायनाने सलग व्या महिन्यात सोने खरेदी आणखी वाढवली आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, तिसऱ्या तिमाहीत जागतिक सोन्याची मागणी इयर ऑन इयर बेसिसवर ३% वाढून १३१३ टन झाली आहे ही विक्रमी तिमाही पातळी आहे. विशेषतः ही विक्रमी खरेदी वाढ डिजिटल सोन्यात अधिक सुरु आहे. उदाहरणार्थ बार आणि कॉइन गुंतवणुकीत १७% वाढ आणि ईटीएफ आवकात (Inflow) १३४% वाढ झाल्यामुळे ही वाढ सोन्यातील रॅली अधोरेखित करणे तथापि वाढलेल्या किमतींमुळे दागिन्यांची मागणीही २३% कमी झाली होती.
मध्यवर्ती बँकांनी तिसऱ्या तिमाहीत २१९.९ टनांची भर घातली, जी वर्षानुवर्षे १०% वाढली, तर खाण उत्पादन २% वाढले आणि पुनर्वापर ६% वाढले, ज्यामुळे एकूण पुरवठा विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. आता मात्र अधिक वेगाने सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने आज दर वेगाने वाढले.
भारतीय कमोडिटी बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'सोन्याचा भाव २००० रुपयांनी किंवा १.६०% ने वाढून १२३००० रुपयांच्या जवळ आला. डॉलरच्या कमकुवत संकेतांमुळे आणि अमेरिकन सरकारने पुन्हा सुरू केल्यानंतर सकारात्मक भावनांमुळे किमती वाढल्या. कॉमेक्स सोन्याने ४०७५ डॉलरवर पाठिंबा दिला. आता लक्ष प्रमुख चलनवाढ डेटावर केंद्रित केले आहे.अमेरिकेतील सीपीआय आणि कोर सीपीआय आणि भारतातील सीपीआय आणि डब्ल्यूपीआय महागाई डेटा जे अल्पकालीन बाजाराची दिशा दर्शवेल. ८८.४५-८९.५० दरम्यान रुपयाची अस्थिरता एमसीएक्स सोन्यातील चढउतारांमध्ये भर घालू शकते. व्यापक कल सकारात्मक राहतो, किंमत १२२०००-१२४५०० पातळीच्या श्रेणीत जाण्याची अपेक्षा आहे.'
चांदीच्या दरातही मोठी उसळी!
सोन्याप्रमाणेच, चांदीच्या दरातही आज प्रचंड वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज २.५० रूपयांनी व प्रति किलो दरात २५०० रुपयांनी वाढ झाली आहे परिणामी चांदीचे प्रति ग्रॅम दर १५५ रूपयांवर गेले असून प्रति किलो दर १५५००० रुपयांवर गेले आहेत. संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीची प्रति १० ग्रॅम किंमत मुंबईसह भारतातील प्रमुख शहरात २४ कॅरेटसाठी १५५० रूपये,प्रति किलोसाठी १६७००० रुपयांवर गेली आहे. तसेच भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ३.०५% वाढ झाल्याने दरपातळी १५२२३८ रुपयांवर पोहोचली आहे.
जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ३.४९% इतकी मोठी वाढ झाली असून युएस सिल्वर स्पॉट दरात आज ३.२८% इतकी विक्रमी वाढ झाली असून प्रति डॉलर दरपातळी ४९.९१ प्रति औंसवर गेली आहे. जागतिक तज्ञांच्या आकलनानुसार, सुरुवातीच्या व्यापारात तीन आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केल्यानंतर, स्पॉट सिल्व्हरचा भाव आज सुमारे ३% वाढून $४९.८/औंसच्या आसपास व्यवहार करत होता. सुरक्षित-आश्रय मागणी असलेल्या चांदीच्या दरात आज रॅली मिळाली आहे. विशेषतः डॉलरच्या किरकोळ घसरणीसह चांदीला आधार मिळाला आहे. इंट्राडे रेंज सुमारे $४८.३४–$५०.०० पर्यंत वाढली आहे, जी मानसिकदृष्ट्या महत्त्वाच्या $५० च्या आसपास वाढलेल्या अस्थिरतेला अधोरेखित करते.