मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक बिनविरोध निवड

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या सर्वांनी उमेदवारी मागे घेतल्याने नाईक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. अशाप्रकारे अजिंक्य नाईक पुन्हा एकदा एमसीएचे अध्यक्ष बनले आहेत.


अध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर, डायना एडलजी आणि विहंग सरनाईक यांनी अर्ज दाखल केले होते मात्र या सर्वांनी उमेदवारीतून माघार घेतल्याने नाईक बिनविरोध अध्यक्ष झाले.


आता मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि खजिनदार या पदांसाठी निवडणूक होणार आहे.


मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन झाल्यानंतर नाईक अध्यक्ष झाले होते. नंतर आता पुन्हा एकदा त्यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली आहे. अजिंक्य नाईक हे २३ जुलै २०२४ रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले होते. वयाच्या ३८ व्या वर्षी अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान त्यांनी मिळवला होता.


अध्यक्षपदासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने आता इतर पदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही निवडणूक १२ नोव्हेंबर रोजी होईल. उपाध्यक्षपदासाठी ९, सचिवपदासाठी १०, सहसचिवपदासाठी ९ आणि खजिनदारपदासाठी ८ अर्ज आले आहेत. तसेच कार्यकारिणी सदस्यांसाठी तब्बल ४८ अर्ज दाखल झाले आहेत. पुढील काही दिवसांत या महत्त्वाच्या पदांवर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026: जाणून घ्या भारताच्या सुपर ८ सामन्यांचे वेळापत्रक; कोणत्या संघासोबत कधी होणार मुकाबला

मुंबई: आयसीसीच्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच आहे. सलग चार विजयांसह, भारताने सुपर ८ मध्ये

अहमदाबादमध्ये भारताचा विजयी चौकार

शिवमचा झंझावात आणि चक्रवर्तीची फिरकी नेदरलँड्सवर १७ धावांनी मात अहमदाबाद  : अहमदाबादच्या मैदानावर भारतीय

शिवम दुबेचे अर्धशतक, भारताने नेदरलँडला दिले एवढे मोठे आव्हान

अहमदाबाद : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या सुपर ८ फेरीसाठी पात्र ठरलेला भारत निव्वळ औपचारिकता म्हणून

पाकिस्तानचा सुपर ८ मध्ये प्रवेश, नामिबियाचा केला पराभव

कोलंबो : नामिबिया विरूद्धच्या सामन्यात १०२ धावांनी विजय मिळवत पाकिस्तानने सुपर ८ फेरीत प्रवेश केला. कोलंबोच्या

दक्षिण आफ्रिकेचा युएईवर विजय, डेवाल्ड ब्रेविसची झंझावात खेळी

अहमदाबाद  : टी-२० विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने संयुक्त अरब अमिरातीचा ६ गड्यांनी पराभव

दिपेंद्र सिंह ऐरीचे झंझावाती अर्धशतक, नेपाळचा स्कॉटलंडवर विजय

मुंबई : दिपेंद्र सिंह ऐरीची स्फोटक फलंदाजी आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर नेपाळने टी-२०