मुंबई: यो यो हनी सिंगचे 'चिलगम' हे नवीन गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात हनी सिंगसोबत मलायका अरोरा दिसत आहे. अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत असणारी मलायका आता या गाण्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. हनीच्या चिलघम या गाण्यात केलेल्या स्टेप्समुळे मलायका ट्रोल होताना दिसत आहे. या गाण्यात मलायकाचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. मात्र या गाण्यात काही ठिकाणी अशा स्टेप्स् केल्या आहेत ज्यावर नेटकऱ्यांनी थेट अश्लील म्हटले आहे.
?si=PfrSeqFdkL3x7FtI
देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर कारवाई करीत नौका जप्त केली आहे. ही ...
दरम्यान गाण्यावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर मलायकाने नेटकऱ्यांना एका मुलाखतीमध्ये उत्तर दिले आहे. या गाण्याला तिने बोल्ड म्हणत ग्लॅमर आणि वेडेपणाचे मिश्रण असे वर्णन केले आहे. तसेच "चिलगममध्ये काम करणे हा अनुभव मजेदार होता. यो यो हनी सिंगची ऊर्जा खूप जास्त आहे. त्यामुळे सेटवर असताना तुम्ही त्याच्या उत्साहाची तुलना करू शकत नाही", असे मलायकाने सांगितले. या प्रतिक्रियेत मलायका ‘बोल्ड अन् मजेदार’ म्हणाल्यामुळे लोक तिच्यावर अजूनच भडकल्याचे चित्र दिसत आहे.






