अहमदाबाद : गुजरात एटीएसने 'आयसिस'शी संबंधित तीन अतिरेक्यांना अटक केली आहे. हे अतिरेकी देशात मोठा घातपात करण्याची योजना आखत होते, असे गुजरात एटीएसने सांगितले. अटक केलेल अतिरेकी वर्षभरापासून भारतात तळ ठोकून होते, त्यांच्यातील दोघे पश्चिम उत्तर प्रदेशचे आणि एक हैदराबादचा आहे. तिघेही ३० ते ३५ या वयोगटातील आहेत. ते प्रशिक्षित अतिरेकी आहेत. अटक केलेल्या अतिरेक्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून धक्कादायक माहिती हाती येण्याची शक्यता आहे.