सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या ‘१२० बहादूर’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज ऐकू येतो. त्यांचा खोल, प्रभावी आणि प्रेरणादायी आवाज ट्रेलरला एक सिनेमॅटिक अनुभवात रूपांतरित करतो - जो साहस, बलिदान आणि निःस्वार्थ वीरतेची कहाणी अधिक रोमांचक बनवतो. पहिल्याच फ्रेमपासून ट्रेलर आपल्या भव्य दृश्यांमुळे आणि मिशनमुळे प्रेक्षकांना बांधून ठेवतो. ट्रांझिशन अप्रतिम आहेत, पार्श्वसंगीत गगनभेदी आहे आणि भावना अंत:करणाला स्पर्श करणाऱ्या आहेत ज्यामुळे हा फक्त ट्रेलर राहत नाही, तर एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.
ट्रेलर आपल्याला ‘रेझांग ला’च्या लढाईची रोमांचक झलक दाखवतो. तो ऐतिहासिक क्षण, जेव्हा चार्ली कंपनीतील १२० सैनिकांनी तब्बल ३००० शत्रू सैनिकांसमोर शौर्याने उभे राहून इतिहास घडवला. दिग्दर्शक रजनीश ‘रेझी’घई यांच्या दिग्दर्शनाखाली आणि रितेश सिद्धवानी, फरहान अख्तर (एक्सेल एंटरटेनमेंट) व अमित चंद्रा (ट्रिगर हॅपी स्टुडिओज) यांच्या निर्मितीत साकारलेला ‘१२० बहादुर’ चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.